स्टोरी

सावंतवाडी शहरवासियांचे आणी कोलगाव ग्रामस्थांचे २४ तास पाणी हे स्वप्न अधुरे राहणार!

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी पाळकोंड धरणाला पायथ्याशी असणाऱ्या जलशुध्दीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांनी २४ तास पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी शासनाकडे सातत्याने केली होती. सन २००४ मध्ये पाळकोंड धरणावर गोडबोले गेट बसविण्यात आले पाणी साठा वाढला. धरण पायथ्याशी जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आला. जलशुध्दीकरण प्रकल्प ते कोलगावाला पाणी पुरवठा करणारा जलकुंभ अशी नियोजित जलवाहिनी टाकायची होती ती जमीन संरक्षित वन जमीन होती. वनविभागाची परवानगी आवश्यक होती. विद्यमान शिंदे- फडणवीस शासन काळात वाढीव पाणी पुरवठयाची मागणी जोर धरु लागली. विद्यमान शासनाने ही मागणी मान्य करुन १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी जलशुध्दीकरण केंद्राची पुर्नबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सुपुर्द केला. म.जी.प्रा. ने हा प्रकल्पाची पुर्नबांधणी पुर्ण केली आहे. परंतु आजही जलशुध्दीकरण प्रकल्प ते कोलगाव जलकुंभ येथून घालण्यात येणाऱ्या जलवाहिनी ही वनविभागाच्या जमिनीतून जात असल्याने वनविभागाची परवानगी प्रतिक्षेत आहे. त्यामुळे कोलगाववासियांचे २४ तास पाणी हे स्वप्न अधुरे राहणार आहे.


Spread the love

Related posts

कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबीराचे उदघाटन .

news

कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे १५ मार्च रोजी प्रकाशन.

news

कल्याण पूर्वेतील पुस्तक रूपी ‘जय शिवराय ‘ मांडणीच्या नांवाची OMG वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद !

news

Leave a Comment