स्टोरी

सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती साजरी.

Spread the love

म्हसळा प्रतिनिधी: संजय खांबेटे: सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे इतिहासातील पराक्रमी राज्यकर्ती म्हणून परिचित असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी झाली. यावेळी अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचे पूजन I.C D.S. च्या  पर्यवक्षिका आणि नाट्य दिग्दर्शिका सौ रेणुका वसंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, ता.कृ.अधिकारी आर.ए .ढंगारे, सोने- चांदीचे व्यापारी अनिकेतशेट जैन, धनंजय सरनाईक, ग्रंथपाल उदय करडे लिपीक श्रीम. सायली चोगले, सहाय्यक प्राची मेंदडकर, आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यवक्षिका आणि उत्कृष्ट दिग्दर्शिका सौ रेणुका पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म २९८ वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी गावात ३१ मे १७२५ रोजी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे तर आईचे नाव सुशीलाबाई होते असे पाटील यानी मनोगत व्यक्त करताना सांगितले.या वेळी अहिल्याबाई होळकर यांच्या वरील विविध पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे यानी केले.


Spread the love

Related posts

५१ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आ. वैभव नाईक यांची उपस्थिती..!

news

देशभरात चित्रपट प्रदर्शित झाला असतांना बंगालमध्ये का नाही? सर्वोच्च न्यायालयाने फटकारले….

news

अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. रुपेश पाटील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित….

news

Leave a Comment