स्टोरी

मणिपूर येथे कमांडोनी केलं ४० बंडखोर ठार

Spread the love

२८ मे वार्ता: मणिपूर कमांडो आणि बंडखोरांमध्ये राज्याच्या अनेक भागात गोळीबार सुरु आहे. गेल्या ८ तासांपासून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत ४० बंडखोऱ्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे बंडखोर एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्नायपर गनचा वापर सामान्य नागरिकांवर करत होते. अनेक गावातील घरे जाळण्यासाठी ते आले होते. मात्र, लष्कर आणि इतर सुरक्षा दलांच्या मदतीने आम्ही ताबडतोब कारवाई सुरु केली आहे.सीएम बिरेन सिंह यांनी दावा केला आहे की, बंडखोर नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करत आहेत. मणिपूरला तोडण्याचा प्रयत्न करणारे सशस्त्र बंडखोर आणि राज्य सरकार यांच्यात ही लढाई आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काल रात्री दोन वाजता बंडखोरांनी इम्फाळ खोरे आणि आसपासच्या भागात एकाच वेळी हल्ला केला. यामध्ये सेकमाई, सुगनू, कुंबी, फयेंग आणि सेराऊ प्रदेशांचा समावेश आहे. इतर अनेक भागात गोळीबार आणि रस्त्यावर बेवारस मृतदेह पडल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, सेकमाई येथील चकमक संपल्याचे बोलले जात आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, इम्फाळमधील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) च्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, फयेंगमधील चकमकीत जखमी अवस्थेत १० लोक रुग्णालयात पोहोचले आहेत. त्याचवेळी, चंदोनपोकपी, बिशनपूर येथे २७ वर्षीय शेतकरी खुमंथेम केनेडी यांचा अनेक गोळ्या लागल्याने मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह रिम्समध्ये नेण्यात आला असून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केनेडी यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलगा आहे.


Spread the love

Related posts

आग्रहाचे निमंत्रण…! उद्या सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने होणाऱ्या दहावी पास विध्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहा…! सिताराम गावडे.

news

किशोर कदम यांची झिम्माड महोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड!

news

कोमसाप सावंतवाडी शाखेच्या १९ जुलै रोजी ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रमाचे आयोजन!

news

Leave a Comment