स्टोरी

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन

Spread the love

या दिंडीसाठी  सनातन संस्थेचे  धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम, प पु दास महाराज , पु लक्ष्मी (उपाख्य माई ) नाईक  यांची वंदनीय उपस्थिती लाभली

सावंतवाडी: दि.२२ मे (वार्ता.): सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या  जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात “हिंदूराष्ट्र-जागृती अभियान” राबवले जात आहे.  या अभियानाचा एक भाग म्हणून तसेच हिंदू मधील ब्रह्मतेज वाढवून त्यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत करण्यासाठी सावंतवाडी शहरात सायंकाळी ३:३० वाजता भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली.

या ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये ४००हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. दिंडीच्या आरंभी सनातन संस्थेचे श्री उमाजी चव्हाण यांनी शंखनाद केला. यावेळी गवळी तिठा येथे धर्मध्वजाचे पूजनबांदा डेगवे येथील धर्माभिमानी श्री जयवंत देसाई यांनी केले. या वेळी पुरोहित्य श्री,जनार्धन भागवत यांनी केले. त्यानंतर धर्माभिमानी डॉ. नितीन म्हाळवणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीला प्रारंभ झाला. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरू सत्यवान कदम हस्ते धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण  करण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कु दिव्या शिंत्रे हिने केले.

या हिंदू एकता दिंडीला येथील गवळी तिठा  येथून प्रारंभ झाला असून पुढे  बस स्थानक , श्रीराम वाचन मंदिर  गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, मिलाग्री हायस्कूल ते पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी नगरपरिषद, श्रीदेव नारायण ,  मंदिर, या मार्गाने जाऊन येथील  बस स्थानकाजवळ  दिंडीची सांगता  झाली दिंडी समारोप झाला. त्यावेळी मान्यवरांचे मनोगत: उपस्थितांना मान्यवर वतक्त्यांचे  मार्गदर्शन – सौ, अंजली मणेरीकर सनातन संस्था  सिंधुदुर्ग हिंदु एकता फेरी काढणार आहोत, असे म्हटल्यानंतर तथाकथित सेक्युलरवादी-पुरोगामी प्रश्न विचारतात की, बहुसंख्यांक झुंडशाही का दाखवत आहेत? जे लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर येऊन नमाज अदा करतात, जे लोक हजारोंच्या संख्येने येऊन शहरांमध्ये दंगे-धोपे करतात, त्यांना हा प्रश्न विचारण्याचे धाडस आमचे भित्रे पुरोगामी करत नाहीत! मला या पुरोगाम्यांना सांगायचे आहे की, होय! ही ‘हिंदु एकता फेरी’ म्हणजे बहुसंख्यांक हिंदूंची झुंडशाही आहे !!ही ‘हिंदु एकता फेरी’ हिंदूंचे महासंघटनाचे प्रदर्शन करण्यासाठी आहे !!! ही ‘हिंदु एकता फेरी’ हिंदु धर्मद्वेष्ट्यांना उत्तर देण्यासाठी आहे !!! ही ‘हिंदु एकता फेरी’ हिंदूंच्या स्वाभिमानासाठी आहे !!! ही ‘हिंदु ऐकता फेरी’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आहे  हिंदु राष्ट्र हा शब्द उच्चारला की, या पुरोगाम्यांच्या पोटात पोटशूळ उठतो. ते तर्‍हेतर्‍हेचे प्रश्न विचारू लागतात की, हिंदु राष्ट्र कसे आणणार?निवडणुका लढवणार का? हिंदु राष्ट्रात अल्पसंख्यांकांचे कायहोणार? अशांसाठी केवळ हिंदूंची एकता हेच उत्तर आहे. जेव्हा ही सकल हिंदुशक्ती एकत्रित दिसेल, जेव्हा ही बहुसंख्य हिंदूंची एकता आविष्कृत होईल आणि तिची व्रजमूठ तुम्हाला दिसेल, त्या क्षणी हे हिंदु राष्ट्रहोऊन जाईल. त्यासाठी कुठल्या निवडणुकांची गरज रहाणार नाही किंवा कोणाच्या बौद्धिक प्रश्नांची उत्तरेदेण्याची गरज रहाणार नाही. एक पेक्षा अधिक हिंदू एकत्रित होतात, तेव्हा विश्वकल्याणाचे कार्य करतात, हा इतिहास आहे. त्यामुळेआपल्या एकत्र येण्याचे आणि रहाण्याने शुभकल्याण होईल,

श्री हेमंत मणेरीकर  हिंदुजनजागृती समिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पहिला हिंदु राष्ट्राचा विचार वर्ष १९९७ मध्ये मांडला. त्या वेळी भाजपचे शासनही नव्हते. त्या वेळी तर कुठलीच अशी स्थिती नव्हती; परंतु जे भविष्यात हिंदु राष्ट्र अवतरित होणार आहे, ते गुरुदेवांनी आधीच पाहिले होते आणि त्यांसाठी आवश्यक हिंदूसंघटनाची समष्टी साधना करा, असा संदेश त्यांनी दिला होता. त्या वेळी सांगितले होते की, पुढे हिंदु राष्ट्र येणारच आहे, आपल्याला काळानुसार साधना म्हणून हे कार्य करायचे आहे.

जेव्हा हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपण सर्व जण बॅकबेंचर असू आणि हिंदु राष्ट्राचे विजयी ढोल वाजवणारे दुसरे कोणी तरी असतील. आजही आम्ही याच भूमिकेत आहोत. आम्हाला केवळ एकच समाधान आहे, आम्ही काळानुसार साधना केली आणि गुरुदेवांचे आज्ञेचे पालन केले.परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे समग्र कार्य अवतारी आहे, याची प्रचीती मी जवळून घेतली आहे. ते जागतिक कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ आहेत. ‘मेडिकल सायन्स’मधील शास्त्रज्ञ आहेत. ते अध्यात्मातील अधिकारी संत आहेत. ते देश-विदेशांतील लाखो साधकांचे मोक्षगुरु आहेत. ते हिंदु राष्ट्र स्थापनेचे विचारवंत आहेत. ते भारतातील शेकडो हिंदू संघटनांसाठी प्रेरणास्रोत आहेत. ते ३५० हून अधिक ग्रंथांचे लेखक म्हणजे साहित्यिक आहेत. ते सनातन प्रभातचे संस्थापक-संपादक होते. ते भाषाशुद्धीचे प्रचारक आहेत. नालंदा तक्षशीलासारख्या उच्च शिक्षण देणार्‍या अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक आहेत. ते सतत संशोधनमग्न असतात. त्यांच्या खोलीतच आतापर्यंत शेकडो अध्यात्माचे प्रयोग झाले आहेत. हे सर्व सांगण्याचे तात्पर्य म्हणजेएकाच वेळी अनेक कार्य करण्याची क्षमता मानवांत नसते; पण परात्पर गुरु ते कार्य करत आहेत. हे कार्य दैवी आहे. जेव्हा अवतार जन्म घेतात, तेव्हा अनेकांचा उद्धार होतो.


Spread the love

Related posts

कल्याण पूर्वेतील विज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे कारण आणि वास्तव स्थिती!_जनतेच्या माहिती साठी_

news

मसुरेत १३ मार्च रोजी मुरघास मशीनचे उदघाटन!

news

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी वन विभागामध्ये दुर्मिळ वनस्पतींबाबत कार्यशाळा..!

news

Leave a Comment