स्टोरी

युक्रेनमधील सध्याची परिस्थिती हा राजकारणाचा किंवा अर्थव्यवस्थेचा प्रश्न नाही तर…..! पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

२२ मे वार्ता: युक्रेनमधील सध्याची परिस्थिती हा राजकारणाचा किंवा अर्थव्यवस्थेचा प्रश्न नाही तर, मानवता आणि मानवी मूल्यांचा मुद्दा आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जी-७ शिखर परिषदेत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कायदा, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी सर्व देशांना केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत ते म्हणाले की, हा संघर्ष सोडवण्यासाठी जे काही शक्य असेल ते भारत करेल.हिरोशिमा येथील जी-७ परिषदेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले. कोणताही तणाव आणि वाद शांततेने संवादाद्वारे सोडवला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले. कायद्याने उपाय सापडला तर तो मान्य करायला हवा आणि याच भावनेने भारताने बांगलादेश सोबतचा भूमी आणि सागरी सीमा वाद सोडवला, असेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या जागतिक परिस्थितीत अन्न, इंधन आणि खतांच्या संकटाचा सर्वाधिक आणि गंभीर परिणाम विकसनशील देशांना जाणवतो. शांतता, स्थैर्य आणि समृद्धी हे आपल्या सर्वांचे समान उद्दिष्ट आहे. आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात, कोणत्याही एका क्षेत्रातील तणावाचा सर्व देशांवर परिणाम होतो आणि मर्यादित संसाधने असलेल्या विकसनशील देशांना सर्वात जास्त फटका बसतो. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भगवान बुद्धांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, आधुनिक युगात अशी कोणतीही समस्या नाही, ज्याचे निराकरण त्यांच्या शिकवणीत सापडत नाही. आपण या भावनेने सर्वांसोबत एकत्र पुढे जाऊ. आज जग ज्या युद्ध, अशांतता आणि अस्थिरतेला तोंड देत आहे, त्यावर भगवान बुद्धांनी अनेक शतकांपूर्वी उपाय सांगितला होता.


Spread the love

Related posts

पुणे येथील ५ व्‍या मानाच्‍या ‘केसरी वाडा’ गणपति बाप्‍पाचे आगमन !

news

वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे विरोधक आक्रमक!

news

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा का केली जाते ?

news

Leave a Comment