स्टोरी

नथुरामचा कबुली जबाब का जाळला? अभिनेते शरद पोंक्षे

Spread the love

१९ मे वार्ता: नथुराम गोडसे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी नथुरामचा कबुली जबाब का जाळला असा संतप्त प्रश्न विचारला आहे.

या व्हिडिओ मध्ये ”नथुरामचा कबुली जबाब का जाळला गेला?’ असा प्रश्न अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला आहे. तसेच नथुराम गोडसेने जेव्हा पहिल्या दिवशी त्यांची जबानी दिली आणि जज तिथून निघून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले पत्रकार जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला, त्यांना घेराव घातला. त्यांच्या जवळ असलेले सगळे दस्तऐवज, नथुरामचा जबाब हिसकावून घेण्यात आला. एवढेच नाही त्यांना दमदाटी करून ते जाबनीचे सगळे कागद जाळण्यात आले. एवढेच नाही तर सर्व पत्रकारांना धमकावण्यात आले की, एक जरी शब्द नथुराम विषयी लिहाल तर तुमची काही खैर नाही. त्यानंतर नथुराम विषयी कधीही कोणत्या पेपरात छापुन आले नाही. अशी संतप्त पोस्ट अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

सतीश मुणगेकर राज्यस्तरिय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

news

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला! इस्रो प्रमुख एस. सोमनाथ

news

स्नेहा विठ्ठल कदम यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय कवी भीमराव कोते काव्य पुरस्कार जाहीर.! 

news

Leave a Comment