स्टोरी

श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडीचे युवा सदस्य दशरथ माळकर यांचे दुःखद निधन

Spread the love

सावंतवाडी वार्ताहर: श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मळेवाड येथे श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडी या मंडळाने विविध मैदानी स्पर्धानच आयोजन केल होत. यामध्ये शैक्षणिक शालेय स्तरावर भाला फेक स्पर्धा, गोळा फेक स्पर्धा, थाळी फेक स्पर्धा तसेच खुल्या गटामध्ये रस्सीखेच स्पर्धा आणि गाव मर्यादित महिलांची रस्सी खेच स्पर्धा या खेळांचा समावेश होता. याच मंडळाचा एक उमदा आणि युवा सदस्य मयूर दशरथ माळकर, वय वर्ष ३६ यांचं अचानक हृदय विकाराने शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी दुःखत निधन झालं आणि गावात एक शोककळा पसरली. मंडळाच्या शिवाजयंती नियोजित कार्यक्रम आणि मैदानी स्पर्धा यामध्ये मयूर माळकर याचा मोठा सहभाग होता. मंडळातील या दुःखत प्रसंगी कार्यक्रमांच आयोजन कारण ही मानसिक वेदनादाई बाब लक्षात घेऊन मंडळाची कार्यकारणी, वरिष्ठ सभासद आणि मयूर याची मित्र मंडळी यांनी नियोजित स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय मंडळाच्या मिटिंग मध्ये घेतला आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्ग बंद! वाहतूक ठप्प….

news

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणार्‍या अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटींची मालमत्ता जप्त!

news

माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्षानिमित्त काँग्रेसचे संपर्क मंत्री. सतेज पाटील यांनी वाहिली आदरांजली!

news

Leave a Comment