राजकारण

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आम्ही समाधानी आहोत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित फोटो)

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आम्ही समाधानी आहोत. या निर्णयाने महाविकास आघाडीला चपराक लगावली आहे. मेरिटवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. परिस्थितीनुसार राज्यपालांनी निर्णय घेतला होता. बहुमत सरकारकडे होते हे सर्वांना माहिती होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आता नैतिकता शिकवू नये, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची नैतिकता कुठे होती, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. व्हीपसाठी तुमच्याकडे माणसे किती आहेत. तसेच नैतिकतेवर बोलायचा अधिकार ठाकरेंना नाही. यापुढेही दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाऊ शकतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. नियमाबाहेर कोणाला जाता येणार नाही. आमचे सरकार कायदेशीर चौकटीतच आहे. बहुमताचे सरकार स्थापन केले होते. घटनाबाह्य सरकार म्हणाऱयांना चपराक दिली आहे. शिवसेना आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे व्हीप आमचाच असेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(संग्रहित फोटो)

निकालाबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. हा लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय आहे. सर्वोच्च महाविकास आघाडीचा चपराक आहे. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेणार आहेत. त्यामुळे आमदारांचे सर्व अधिकार त्यांना आहेत. तसेच निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयानंतर दिली आहे.

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद मी बघत नाही. पण आज शेवटचा भाग बघितला आहे. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचा मुद्दा मांडला आहे. उद्धव ठाकरे हे भाजपासोबत निवडणूक आले आणि काँग्रेस, राष्ट्वादीसोबत गेले तेव्हा त्यांची नैतिकता कुठे होती, अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये, नैतिकतेवर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. लोकं सोडून गेल्याच्या लाजेपोटी आणि भीतीपोटी उद्धव ठाकरे यांनेी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नैतिकतेचा विषय बनवू नका. एकनाथ शिंदेंचा राजीनामा देण्याचा विषयच होत नाही, तेच मुख्यमंत्री आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Spread the love

Related posts

कधी कधी वाटते औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार! – नीलेश राणे, भाजप

news

कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद.

news

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल!

news

Leave a Comment