राजकारण

सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Spread the love

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल मत व्यक्त केले आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत बोलतांना “मला वाटतं हे योग्य नाही. शांतपणे निर्णयाची वाट पाहावी, आम्ही पूर्णपणे आशादायी आहे. काही होणार नाही. आम्ही सर्व कायदेशीर केले आहे, त्यामुळे योग्य निर्णय येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्धा येथे आज (दि.१०) ते माध्यमांशी बोलत होते. खरीप आढावा बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पेरणीसाठी शेतकऱ्यांना योग्य बियाणं उपल्बध करून दिली जातील. पेरणीसाठी पुरेशी बियाणे आहेत. तरीही बाहेरून घेत असलेल्या बियाणांची गुणवत्ता तपासण्याच्या सुचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी बियाणांची पावती जपून ठेवावी. बियाणे घेतल्यानंतर त्याच्यात फसवणूक झाली तर भरपाई मिळते, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. शिवाय बोगस बियाणे विक्रेत्यांवर फौजदारी खटला भरला जाईल, असा इशाराही फडवीस यांनी विक्रेत्यांना दिला आहे.


Spread the love

Related posts

बाळासाहेब थोरात यांची राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी हास्यास्पद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

news

अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे; विरोधी पक्ष आक्रमक, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान….

news

आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार बजेट अंतर्गत ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

news

Leave a Comment