स्टोरी

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम यांनी केली आत्महत्या?

Spread the love

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक पोलीस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेदरम्यान रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. ते सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना ते आव्हाड यांचे अंगरक्षक होते. त्यावेळी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना ठाणे पोलिसांनी अटकही केली होती. वैभव कदम हे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गिकेवर आले. त्यावेळी त्यांनी रेल्वेगाडीखाली येऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. त्यांच्या आत्महत्येची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आव्हाड हे मंत्री असताना त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या मारहाणीप्रकरणात कदम यांना अटक झाली होती. त्यानंतर ते जामीनावर सुटले होते.


Spread the love

Related posts

आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार.

news

आंगणेवाडी येथील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी विजेता….

news

निवती बंदर येथे ३ मार्च रोजी खुल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धा! विठ्ठल रखुमाई मंदिराच्या २३ व्या वर्धापनदिना निमित्त आयोजन.

news

Leave a Comment