स्टोरी

यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांचा मुणगेत समाजोपयोगी उपक्रम!

Spread the love

मसुरे प्रतिनिधि: मुणगे गावातील प्रभाग क्रमांक एक मध्ये यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या सौजन्याने तसेच आडबंदरचे सुपुत्र श्री. आनंद मालाडकर यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत सदस्या सौ. रवीना मालाडकर,सौ.अंजली सावंत, माजी उपसरपंच श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ. सायली बागवे यांच्या प्रयत्नांनी गुढीपाडवा मराठी नूतन वर्षानिमित्त महिला बचत गटाच्या सदस्यांची मार्च,एप्रिल महिन्याची मासिक वर्गणी बचत गटाच्या अध्यक्षा, सचिवांकडे सुपूर्त करण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक एक अंतर्गत आडबंदर, आपई, वाघोळी, कारीवणे वाडी या वाड्यांमध्ये मिठाई वाटत मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सातत्याने आपल्या प्रभागातील लोकांशी जनसंपर्क साधत नवनवीन सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी कायम ठेवल्याने सदस्यांना विभागातील सर्व स्तरावर लोकांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे अशी माहिती आनंद मालाडकर यांनी यावेळी दिली.


Spread the love

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले बॅनर्सची अवहेलना होऊ नये! आनंद गायकवाड

news

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ‘आंतरधर्मीय समिती’ची नियुक्ती!

news

सौ. सुहासिनी विजय परब यांचे निधन.

news

Leave a Comment