क्राईम

उबाठा पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांची हत्या.

Spread the love

ठाणे प्रतिनिधी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री जीवघेणा हल्ला झाला असून, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील मानपाडा येथील मनोरमानगर परिसरातील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर बसलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर दोन राऊंड गोळीबार केला आणि चाकूनेही हल्ला केला. कापूरबावडी पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत असून, प्राथमिक माहितीनुसार दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रदीप पुर्णेकर हे कार्यालयात बसले असताना दोन जण आत घुसले. त्यांनी पुर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यावर चाकूनेही हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेतील पुर्णेकरांना स्थानिकांनी इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके तपास करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून एकूण 5 संशयितांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे


Spread the love

Related posts

खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी ……!

news

सिंधुदुर्गातून नुकतेच बदली झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे निलंबित!

news

नवी मुंबईत पुन्हा उघडला ‘माया व्हीआयपी’ बार; रात्री उशिरापर्यंत अश्लील कृत्यांचा धडाका

प्रसाद परब

Leave a Comment