क्राईम

१२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणारी महिला आरोपी गजाआड..!

Spread the love

सावंतवाडी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई. करत सावंतवाडी बसस्थानक परिसरात एका प्रवाशाचे तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला आरोपीला गजाआड करण्यात केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने जालना जिल्ह्यातील मंठा येथून सापळा रचून या महिलेला ताब्यात घेतले. संगीता सुभाष जाधव वय ३५ वर्ष, रा. संग्राम हॉटेलच्या मागे झोपडपट्टी, मंठा, जिल्हा जालना असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी बसस्टँड परिसरातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण तपासले. या तपासात हा गुन्हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार महिला संगीता जाधव हिनेच केल्याचे स्पष्ट झाले. सावंतवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.


Spread the love

Related posts

शिक्षकेला लग्नाचे आमिष आणि नंतर शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लैंगिक अत्याचार

news

आंबेगाव येथून आपल्या मालकीचे बैल नातेवाईकांकडे सासरवाडीला चौकुळ येथे नेत असतांना जानू फाले यांना अज्ञात व्यक्तीकडून बेदम मारहाण.

news

तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना पोलिसांनी केले अटक

news

Leave a Comment