क्राईम

नवी मुंबईत पुन्हा उघडला ‘माया व्हीआयपी’ बार; रात्री उशिरापर्यंत अश्लील कृत्यांचा धडाका

Spread the love

नवी मुंबई | महाराष्ट्र  न्यूज नेटवर्क : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या माया व्हीआयपी बारमध्ये रोज रात्री उशिरापर्यंत अश्लील नृत्य आणि ‘पैशाचा पाऊस’ पडत असल्याचे गंभीर प्रकार समोर आला आहे. महिनाभरापूर्वी अधिवेशन काळात नवी मुंबईतील अनेक लेडीज बार बंद करण्यात आले होते, तरीही हा बार पुन्हा सक्रिय झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.बारमध्ये नियमितपणे होणाऱ्या अश्लील कार्यक्रमांमुळे परिसराचे वातावरण बिघडत असून, युवक-युवतींवर वाईट प्रभाव पडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.महाराष्ट्र न्यूजकडून नवी मुंबई पोलीस आयुक्तांना त्वरित कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. अशा प्रकारचे अनैतिक व्यवहार थांबवून, कायद्याचे पालन करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल.


Spread the love

Related posts

झाराप येथील घटनेतील दोषींवर कडक कारवाई करा..! सकल हिंदू समाज 

news

संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन फेटाळला ! राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचे प्रकरण

news

मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या २ मुलांना पालघर येथून अटक !

news

Leave a Comment