स्टोरी

काँग्रेसचे निष्ठांवत नेते अनंतराव थोपटे यांचे दुःखद निधन.

Spread the love

पुणे | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : भोर मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेले, माजी शिक्षणमंत्री, पालकमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे आज ४ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. थोपटे यांच्या निधनामुळे जिल्ह्याचा बुलंद आवाज हरपल्याची भावना काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली. अनंतराव थोपटे यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. आज गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. शुक्रवारी सकाळी भोर येथे त्यांच्यावर अंत्यविधी होतील. १९७२ ते २०२४ या पाच दशकांचा विचार केल्यास, ७ वर्षांचा अपवाद सोडल्यास थोपटे कुटुंबियांनी भोरचं प्रतिनिधीत्व केलं. या मतदारसंघातून अनंतराव थोपटे सहावेळा निवडून गेले. ते काँग्रेसचे निष्ठांवत कार्यकर्ते होते. भोर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा एकेकाळी मोठा दबदबा होता. जिल्ह्यातील काँग्रेसची पक्षसंघटना मजबूत करण्यात थोपटे यांचे महत्त्वाचे योगदान होते. थोपटे यांनी भोर मतदारसंघातून सहा वेळा विजय मिळविला. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी १४ वर्षे विविध मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.


Spread the love

Related posts

मालवणात शिवसेनेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news

फ्लॉरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवली येथे फॅशन डिझायनिंग शॉर्ट टर्म कोर्सचा प्रारंभ!

news

मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडकमधील कामांबाबत आ. वैभव नाईक यांनी घेतली सचिवांची भेट…!

news

Leave a Comment