स्टोरी

उल्हासनगरमध्ये ‘सेवा संकल्प अभियाना’चा दिमाखदार शुभारंभ; वीरगाथा वाचनासह सैनिकांचा सन्मान.

Spread the love

उल्हासनगर प्रतिनिधीदि. २९ सप्टेंबर (सुधीर गुजर):महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा उल्हासनगरमध्ये आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात देशासाठी योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक, आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.उल्हासनगर मनपा शाळा क्रमांक २४ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत एकत्रितपणे ‘वीरगाथे’चे वाचन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘सेवा, संकल्प, जनकल्याण आणि विकसित भारत’ हा शासनाचा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. तसेच, विकसित भारताच्या संकल्पनेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली.सदर कार्यक्रम उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

याप्रसंगी उल्हासनगरच्या महापौर अश्विनी कमलेश निकम आणि नगरसेवक श्री. दुर्गा राय यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी मनपाचे प्रशासन अधिकारी श्री. किशोर गोसावी, शिक्षण विभागाच्या लेखा अधिकारी श्रीम. नीलम कदम, अग्निशमन अधिकारी श्री. सुरेश बोंबे आणि प्र. सुरक्षा अधिकारी श्री. हरेश नागपुरे यांनी विशेष परिश्रम घेतले व सक्रिय सहभाग नोंदवला.”सेवा संकल्प अभियान: जनसेवेतून जनकल्याणाकडे!” या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारी या अभियानाची प्रभावी सुरुवात उल्हासनगरमध्ये झाली आहे, अशी माहिती मनपाच्या जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिली.


Spread the love

Related posts

क्रीडा संकुलचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी येत्या दि. १५ ऑगस्ट दिवशी आमरण उपोषण करणार! शीतल राऊळ

news

किल्ले सिंधुदुर्गवर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.

news

महाराष्‍ट्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सवांच्‍या ठिकाणी वस्‍त्रसंहिता असायला हवी ! अभिनेत्री दीपाली सय्‍यद खान

news

Leave a Comment