स्टोरी

गणेश चतुर्थी कालावधीत ४५ गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: गणेश चतुर्थी कालावधीत जवळपास 45 गणेश मूर्तींचे विसर्जन कुंडामध्ये करण्यात आले या माध्यमातून सावंतवाडीच्या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अशी माहिती मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली. ते म्हणाले गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्वाचा व उत्साहाचा सण आहे. गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक स्वच्छ व प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा करण्याच्या उ‌द्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान 7.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये नगरपरिषदेकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा वापर करणे, कृत्रिम विसर्जन तलावाचा वापर करणे निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करणे, सजावटीमध्ये पर्यावरणाचा वापर करणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, वीज बचत करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन न. प. ने व्यवस्था करून दिलेल्या कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन नगरपरिषदकडून माहितीपत्रके नागरिकांना वाटप करून करण्यात आलेले होते. त्यानुसार सावंतवाडी नगरपरिषदेने बोट क्लब, निर्माण भवन जवळ, शिवउ‌द्यान समोरील बाजूस, भटवाडी, सर्वोदय नगर, जुस्तीन नगर, मराठा वसतीगृह नजीक, होळीचा खुंट अशा विविध ठिकाणी गणपती मूर्ती विसर्जन कुंड बसवून जल प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था नगरपरिषदेकडून करण्यात आलेली होती.

तसेच विसर्जन ठिकाणी मूर्ती विसर्जन कुंडामध्ये फुलांची आरास करण्यात आलेली होती. तसेच प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी न.प. कर्मचारी नेमण्यात आलेले होते. अशा प्रकारे न. प. प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली होती.सदर उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 45 गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक सण साजरे करत असताना जल प्रदूषण टाळण्यासाठी या पुढेही नगरपरिषदकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी . नगराध्यक्षा, श्रद्धा सावंत भोसले मा. उपनगराध्यक्ष, ॲड अनिल निरवडेकर . तसेच सर्व खात्याचे सभापती नगरसेवक यांचे सहकार्य लाभले


Spread the love

Related posts

छत्रपती संभाजीनगर येथील ‘दामिनी पथका’कडे १२ दिवसांत २२ तक्रारी!

news

कौतुकाची थाप मिळणे प्रत्येकासाठी आनंददायी ! दत्तप्रसाद पेडणेकर 

news

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला! इस्रो प्रमुख एस. सोमनाथ

news

Leave a Comment