क्राईम

निगुडेतील ६१ वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार..! संशयित ताब्यात

Spread the love

बांदा प्रतिनिधी (संतोष परब): निगुडे गावातील ६१ वर्षीय वृद्धाकडून १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयितावर बाललैगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे. जयदेव विठ्ठल म्हाडगुत (रा. निगुडे, ता. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना मे महिन्यानंतर तब्बल दोन वेळा अत्याचार केल्याची माहिती आहे. याबाबत संबंधित मुलीने घरात माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा संशयिताला अटक करण्यात आली. याबाबत बांदा पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संबंधित संशयिताचे गावात किराणा दुकान आहे. त्या ठिकाणी ती अल्पवयीन घरातील मे महिन्यात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी ती एकटीच असल्याची संधी साधून त्या नराधमाने तिला दुकानात बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला. घरातील व्यक्तीनी तिला दुकानात जा असे सांगितल्यानंतर ती घाबरू लागली. त्यामुळे तिच्या आईला संशय आला. अधिक विचारणा केली असता तिने ही माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या संशयिताच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोक्सो कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.


Spread the love

Related posts

२००८ मधील बेंगळुरूतील साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी महंमद अरशद खान याला अटक

news

मुंबई येथे मुसलमानाकडून फसवल्याविषयी हिंदु युवतीची तक्रार! विवाह करण्यास मात्र नकार!

news

बांदिवडे येथे अनधिकृत वाळू वाहतुक करताना तीन डंपर जप्त…! दंडात्मक कार्यवाही होणार.

news

Leave a Comment