स्टोरी

स्वर्गीय प्रतिमा सोनटक्के हिच्या स्मरणार्थ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

दोडामार्ग: स्वर्गीय प्रतिमा सोनटक्के हिच्या स्मरणार्थ मैत्रक चॅरिटेबल फाउंडेशन पुणे मार्फत ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हे साहित्य मुलांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग पोलीस बांधवांच्या माध्यमातून हे साहित्य जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बोडदे च्या प्रत्येक मुलाला हे शैक्षणिक साहित्याचे किट मिळाले आहे. त्याबद्दल मैत्रक चॅरिटेबल फाउंडेशन पुणे यांचे शाळा व्यवस्थापन समिती बोडदे तालुका दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग यांजकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर या मदतीसाठी सिंधुदुर्ग महामार्ग पोलीस यांचेही विशेष आभार बोडदे ग्रामस्थांच्या वतीने मानण्यात येत आहेत.


Spread the love

Related posts

अभिजित जाधव यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार जाहीर.

news

सावंतवाडी खासकीलवाडा येथील श्री वटसावित्री देवस्थान मंदिर येथे आज महाप्रसादाचे आयोजन!

news

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने नगरपरिषदेच्या ६० सफाई कामगारांना स्वेटर आणि मिठाई वाटप.

news

Leave a Comment