स्टोरी

सावंतवाडी खासकीलवाडा येथील श्री वटसावित्री देवस्थान मंदिर येथे आज महाप्रसादाचे आयोजन!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: येथील खासकीलवाडा मधील श्री वटसावित्री देवस्थान मंदिर येथे आज २८ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेले कित्येक वर्ष श्रावणी सोमवारच्या पहिल्या आठवड्यात सर्व भक्तांना महाप्रसाद देण्याची प्रथा माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते सुधन्वा आरेकर यांनी आखून दिली आहे. त्यांना आतापर्यंत अनेकांनी सहकार्य केले आहे. हे वटसावित्री कला क्रीडा मंडळ स्थापन झाली त्यानंतर तेथे वटसावित्री मंदिर उभारण्यात आले आहे. याठिकाणी श्रावणी सोमवारी सकाळी पूजा त्यानंतर दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद श्री सुधन्वा आरेकर यांच्या मार्फत दिला जाणार आहे. तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

पुढील ४८ घंट्यांत मोसमी पावसाच्या आगमनासाठी हवामान अनुकूल!

news

मसुरे नं.१ शाळेची ८० वर्षाची माजी विद्यार्थिनी श्रीम.सीमा सावंत/साटम यांनी शाळेला दिली एक लाखाची शैक्षणिक मदत.

news

आरोग्य प्रश्नाबाबत दिरंगाई खपवणार नाही..! न्यायमूर्ती कणिँक

news

Leave a Comment