शिक्षण

कळसुलकर हायस्कूलच्या इयत्ता पाचवी व आठवी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग अशी झेप घेत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रशालेला १२५ वर्ष शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कळसुलकर हायस्कूलचे तब्बल ११ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत येऊन प्रशालेने चमकदार अशी कामगिरी केली आहे, ही बाब प्रशालेसाठी अभिमानास्पद आहे. यामध्ये इयत्ता पाचवी मध्ये एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आला आहे.

पूर्व प्राथमिक इयत्ता पाचवी (कुमार अंश प्रज्योत सावंत*- जिल्ह्यात ३१ वा) तर उच्च प्राथमिक इयत्ता आठव १).कुमार दुर्वांक किशोर वालावलकर – जिल्ह्यात ३ रा, २).कुमारी गार्गी राजेश परब -जिल्ह्यात १३ वी, ३) कुमार अनुराग विजय ठाकर- जिल्ह्यात १८ वा, ४) कुमार चिन्मय रमेश गावडे, जिल्ह्यात २३ वा, ५) कुमार पियुष नाना शिर्के- जिल्हात २५ वा. कुमार प्रथमेश विलास सोनटक्के- जिल्ह्यात ३१ वा, ७).कुमार स्वयंम आप्पाजी पाटील- जिल्ह्यात ३९ वा, ८).कुमारी आर्या अरविंद कुडतरकर- जिल्ह्यात ४१ वी, ९) कुमारी अलिशा यशवंत मेस्त्री – जिल्ह्यात ४२ वी, १०) कुमारी माहिया शंकर धुरी- जिल्ह्यात ४५ वी, ११)कुमार सोहम गुरुनाथ चितारी- जिल्ह्यात ४६ वा.

तसेचइतर शाळेतून प्रशालेमध्ये प्रवेश घेतलेले शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:- इयत्ता पाचवी*१.कुमारी सई शिवाजी आरेकर* जि.प.शाळा नंबर २, २) कुमार साहिल शाहू खरात, जि.प.शाळा नंबर २, ३).कुमारी दूर्वा अजित सावंत, जि.प.शाळा नंबर २, ४).कुमारी सानवी चेतन देसाई, जि.प.शाळा नंबर २, तसेच इयत्ता आठवी कुमारी गौरी राजन गावडे, जि.प.शाळा कास नंबर १

सदर विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक इयत्ता पाचवीसाठी श्री अनिल ठाकूर, श्री सिद्धेश कुलकर्णी, सौ. सुस्मिता चव्हाण, श्रीमती प्रतीक्षा परब, यांचे तर इयत्ता आठवीसाठी सौ. सोनाली बांदेलकर, सौ. साक्षी दळवी, श्रीमती समृद्धी सामंत, श्रीमती गीता सावंत यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. सदर विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. शैलेशजी पई, सचिव डॉक्टर मा. श्री प्रसादजी नार्वेकर, संस्थेचे सर्व संचालक मंडळ ,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही.भुरे, पर्यवेक्षक श्री सुबोध वराडकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद तसेच पालक वर्ग, हितचिंतक माजी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा !

news

शिक्षकांच्या नावासमोर टी आर ही पदवी लावली जाणार!आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

news

जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नं.१ मालवण च्या मुलांनी घेतला, क्षेत्रभेटीचा अनुभव.

news

Leave a Comment