सावंतवाडी: आज दुपारी दोन च्या दरम्यान पोलीस स्टेशनच्या मुख्य रस्त्यावर झाड तुटून पडलं त्यामुळे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक झालं होतं त्याच दरम्यान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्या रस्त्यावरून जात असताना गाडीतून उतरून तत्काळ झाडाच्या फांद्या तोडून रहदारीस मार्ग मोकळा करून दिला. यासाठी पोलीस अनिल धुरी यांनी सहकार्य केले तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे,लक्ष्मण कदम, आशिष बांदिवडेकर व संदेश नाईक यांनी हे झाड हटवून वाहन चालकांना मार्ग मोकळा करून दिला.वाहन चालकांकडून त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
