क्राईम

सावंतवाडी शहरातील आजूबाजूच्या गावांमध्ये करणी बाधा करणाऱ्या बुवाबाबांमुळे नागरिक त्रस्त.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: समाजामध्ये नोकरी न लागणे तसेच लग्न न होणे. अशा अनेक बाबीमुळे ताण तणाव वाढला आहे. सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. अशा धरतीवर देव देवसकी अन धनंतर मंतर करणीच्या माध्यमातून सध्या समाज विखुरला जात आहे. अशाच एका गावात शहरापासून लगत असलेल्या गावात धंतर मंतर करणी बाधा यामुळे अनेकांचे संसार कुटुंब आज उध्वस्त होत आहेत. त्यामुळे या कुटुंबाची तरुण पिढी वेडीपिशी होऊन गावातच भटकत आहेत. त्यामुळे अशा या धंतर मंतर वृत्तीला आळा घालणे आवश्यक आहे. अशी मागणी या गावातील तरुण वर्गाकडून होत आहे. एका युवकाला त्याचे कुटुंब या अशा किरणी बाधा चे शिकार बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये सामाजिक आर्थिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले आहे. त्यामुळे हे कुटुंब सध्या हतबल झाले आहे. काही वर्षांपूर्वीच देवदेवसकीच्या बाधामुळे कुटुंबातील आधार म्हणजे त्यांचे वडील यांचा बळी गेला. त्यानंतर हे कुटुंब काही प्रमाणात सावरत असतानाच अचानक आई आजारी पडली आहे. घरात कुणी करताच नाही. नोकरी करायची तर या देवदिवसकीच्या अन धंतरमंतर करणी बाधा आडवा येत आहे. अशी धारणा त्यांची झाली आहे.त्यामुळे या अशा प्रकारामुळे गावातील अनेक कुटुंबियांमध्ये सामाजिक स्वास्थ बिघडण्याची उदाहरणे ही त्यांनी दिली आहेत.

गावात मानपान आणि देवकी ही साठी प्रसिद्ध असलेला हा गाव शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेला हा गाव पण या गावात विकासात्मक दृष्ट्या म्हणावा तसा प्रगत झालेला नाही. पण गावातील तरुण सध्या नोकरी नाही, उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे ते अवैध्य मार्गाकडे झुकले आहेत. हे सर्व गावाच्या स्वस्त व सामाजिक बिघडण्याकडे धंतर मंतर करणी बाधा प्रकार असल्यामुळे या युवकांच्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख आजूबाजूच्या गावातील अध्यात्मिक क्षेत्राकडे धाव घेत आहेत. या तरुणाने नाव न सांगण्याच्या अटीवर हे कुठेतरी थांबायला हवे अशी त्याची मागणी आहे. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन तसेच पोलीस यंत्रणेने या भागाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या गावातील प्रमुख देवस्थान मानकऱ्यांनी आपल्या भागातील ग्रामदैवत कुलदैवत यांच्याकडे कौल घ्यावा आणि या गावाच्या विकासाच्या आणि सामाजिक स्वास्थ बिघडण्याकडे लक्ष देण्याची विनंती त्याने केली आहे. जेणेकरून आपल्यासारखे अनेक तरुण अशा प्रवृत्तीचे बळी ठरू नयेत आणि ही वाईट प्रवृत्ती दूर होणे गरजेचे आहे.असे त्यांनी स्पष्ट केले.


Spread the love

Related posts

पोलीस भरतीमध्ये बनावट कागदपत्रे दिल्याने १० जणांविरोधात गुन्हा नोंद !

news

त्या व्हायरल पत्र प्रकरणी रायगड पोलिसांची कारवाई! पुण्यातून एकाला अटक;

news

डोंबिवलीत धक्कादायक घटना : पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांमुळे पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; भावाच्या तक्रारीवरून पत्नीवर गुन्हा दाखल

प्रसाद परब

Leave a Comment