१२ जून वार्ता: धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना मुंढेंनी धमकी देणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत खडेबोल सुनावले. “माझे निर्णय सार्वजनिक हितासाठी असतात आणि ते धमक्यांना भून बदलणार नाहीत,” असा कडक इशारा त्यांनी दिला आहे. धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर कारवाईचा धडका लावला आहे. दूध भेसळ, अन्न भेसळ, मेडिकल, औधष पुरवठा करणाऱ्यांवर धाडसत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे. तुकाराम मुंढेंच्या धाडसी बाण्याचं दुध उत्पादक शेतकऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने स्वागत केलंय. आटपाडी तालुक्यातील बनपुरीत तुकाराम मुंडे यांच्या कार्याला दुग्धाभिषेकातून जाहीर पाठिंबा दिला. आहे. भेसळयुक्त दूधविरोधात शेतकरी, दूध उत्पादक व नागरिक एकवटले आहेत.
अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी अवघ्या सात दिवसांत भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर ३३ धाडी टाकून ३४ आस्थापने सील केली, तर ३५ एफआयआर दाखल केले. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्य अधिक बळकट होत असल्याची भावना ग्राहक पंचायतीने व्यक्त केली आहे. यामुळे खाद्यपदार्थांतील भेसळीला लगाम बसू शकेल. त्यामुळे शासनाने त्यांना संरक्षण देण्याची मागणी यावेळी केली.
