क्राईमस्पोर्ट

चिरावा : ट्रायल रूममध्ये लज्जास्पद घटना; दुकान मालकाच्या मुलाने तरुणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला

Spread the love

राजस्थान | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : शनिवारी सायंकाळी चिरावातील जुन्या तहसीलदार रोडवरील जॅम-जॅम कलेक्शन या कपड्यांच्या दुकानात धक्कादायक प्रकार समोर आला. खरेदीसाठी आलेल्या एका तरुणीने ट्रायल रूममध्ये कपडे बदलत असताना, दुकान मालकाच्या मुलाने मोबाईल फोनद्वारे लहान छिद्रातून तिचा व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केल्याची घटना उघडकीस आली.पीडित तरुणीने कपडे घेतल्यानंतर ट्रायल रूममध्ये परिधान करण्यासाठी प्रवेश केला. अचानक फोन वाजल्याने ती सावध झाली आणि ट्रायल रूमच्या भिंतीत पाडलेले छोटे छिद्र लक्षात आले. तिथून चित्रीकरण सुरू होते. याबाबत तिने आरडाओरड करत निषेध व्यक्त केला.तरुणीने तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी शाहरूख (दुकान मालकाचा मुलगा) याला ताब्यात घेतलं असून, चौकशी सुरू केली आहे. दुकान सील करण्यात आले असून, परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.या घटनेने महिलांच्या गोपनीयता व सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


Spread the love

Related posts

राष्ट्रीय तपास संत्रणेनेचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात ४० हून अधिक ठिकाणी छापे….!

news

ठाणे येथील एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद!

news

मुंबईत अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍या ९ जणांना अटक !

news

Leave a Comment