मनोरंजन

Jay Jay Swami Samarth : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

Spread the love

मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जय जय स्वामी समर्थ मालिकेत गंगा, गायत्री आणि गोवर्धन यांच्या आयुष्याशी जोडलेले मोठे रहस्य उलगडण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने गंगा आणि अंबरीश अक्कलकोटपर्यंत पोहोचतात, जिथे त्यांना गायत्रीशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे मिळतात.

  • गंगा आणि गायत्री यांच्यातील नात्याचा उलगडा होत असतानाच कथानक अधिक उत्कंठावर्धक बनत आहे
  • सत्य स्वीकारण्याऐवजी तो आपल्या पापांच्या ओझ्याखाली दबत जातो.
  • जय जय स्वामी समर्थ ही मालिका दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते.

जय जय स्वामी समर्थ मालिकेत आता गंगा, गायत्री आणि गोवर्धन यांच्या आयुष्याशी जोडलेले मोठे रहस्य उलगडण्याच्या मार्गावर आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने गंगा आणि अंबरीश अनेक अडथळ्यांवर मात करत अक्कलकोटपर्यंत पोहोचले असून, त्यांच्या शोधयात्रेला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मिळालेल्या संकेतांमधून गंगाचा संबंध ‘गायत्री’ नावाच्या महिलेबरोबर असल्याचे स्पष्ट होते. या गूढाचा उलगडा करण्यासाठी दोघे एका रहस्यमय पडक्या घरात पोहोचतात, जिथे त्यांच्या आयुष्याला हादरवून टाकणारे सत्य दडलेले असते. घरातील आगीच्या खुणा, विचित्र अनुभव आणि स्वप्नांत दिसणाऱ्या घटनांमुळे गंगा अस्वस्थ होते. त्याचवेळी स्वामी समर्थ सूचित करतात की आता भूतकाळातील रहस्य समोर येण्याची आणि गोवर्धनच्या कर्मांचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे. गंगा आणि गायत्री यांच्यातील नात्याचा उलगडा होत असतानाच कथानक अधिक उत्कंठावर्धक बनत आहे.दुसरीकडे, मार्तंडच्या प्रभावाखाली आलेला गोवर्धन स्वामी समर्थांना विषारी लाडू देऊन त्यांचा जीव घेण्याचा कट रचतो. प्रायश्चित्ताच्या नावाखाली तो स्वामींच्या समोर येतो, मात्र स्वामी त्याला स्वतःचा गुन्हा कबूल करण्याची अखेरची संधी देतात. तरीही सत्य स्वीकारण्याऐवजी तो आपल्या पापांच्या ओझ्याखाली दबत जातो. “कोडं सुटायची वेळ झाली… केलेली कर्म फिटायची वेळ झाली,” या स्वामी समर्थांच्या शब्दांनी गोवर्धन हादरून जातो.आता गंगा गायत्रीपर्यंत पोहोचेल का, गोवर्धन आपल्या गुन्ह्याची कबुली देईल का आणि भूतकाळातील नेमके कोणते धक्कादायक सत्य समोर येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. सत्य आणि असत्याच्या संघर्षाला नवे वळण देणारे हे भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहेत. जय जय स्वामी समर्थ ही मालिका दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते


Spread the love

Related posts

‘देऊळ बंद २’चा यशस्वी प्रवास; स्नेहल तरडे म्हणाली, “प्रवीणने पत्नी म्हणून नव्हे, तर क्षमतेनुसार दिली प्रमुख भूमिका”

प्रसाद परब

कैलाश खेर यांनी भस्म आरतीत घेतला भाग, महाकालच्या चरणी केली नमन

प्रसाद परब

भाऊ कदम आणि गौतमी पाटीलची ‘हिल पोरी हिला’ जोडी सुपरहिट! दादा कोंडकेंच्या अजरामर गाण्यावर झक्कास डान्स, लेकीची खास प्रतिक्रिया चर्चेत

प्रसाद परब

Leave a Comment