स्टोरी

सावंतवाडी लक्ष्मीनगर येथील रस्त्याच्या उतारतीवरचं मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे सत्र सुरू..! रवी जाधव

Spread the love

सावंतवाडी: एका वर्षापूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील अनेक खड्ड्यान बरोबरच लक्ष्मीनगर येथे रस्त्याच्या उतरतीवरच मधोमध पडलेला खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले तेव्हा तो खड्डा बुजवण्यासाठी तेथील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची मदत मागितली होती. त्या गंभीर विषयाची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीच्या पुढाकारातून तो उतारतीवरचा खड्डा सिमेंट काँक्रेटने बुजवला होता त्यासाठी नगरपरिषदेचे मनोज राऊळ यांनी देखील सहकार्य केले होते. परंतु सततच्या रहदारीमुळे पुन्हा त्याच ठिकाणी रस्त्याच्या उतारतीवर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडून पुन्हा अपघात सुरू झाले आहेत रात्रीच्या काळोखात खड्ड्याचा अंदाज न आल्याने रात्रीच्या वेळी अनेक अपघात घडत आहे याची दखल कोणीच दखल घेत नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे मदत मागितली आहे परंतु आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत नगरसेवक निवडून आले आहेत तरी त्या प्रभागातील संबंधित नगरसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन या गंभीर विषयावर तत्काळ व काळजीपूर्वक लक्ष घालून तो खड्डा त्वरित बुजवून घेऊन पुढे होणारे अपघात टाळावेत अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेल्या मेजर सुभेदार यांचे गावात उस्फुर्त स्वागत! तळवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर नित्यानंद सावंत.

news

विकासाचे व्हिजन असलेले आमदार वैभव नाईक साहेब नमस्कार…!

news

अखेर नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं

news

Leave a Comment