स्टोरी

सावंतवाडी येथे “ज्ञानियांचा राजा–मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने “ज्ञानियांचा राजा–मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम बुधवार २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता बॅरिस्टर नाथ पै बहुउद्देशीय सभागृह , सावंतवाडी येथे होणार आहे.या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांमुळे महाराष्ट्रातील संतपरंपरा, वारकरी संप्रदाय तसेच सामाजिक ऐक्यभाव अधिक दृढ झाला. त्यांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त राज्यशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत व्याख्याते गणेश शिंदे या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने होत आहे.

या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे जिल्हाधिकारी तृप्ती घोडा मिसे आधी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, वारकरी बांधव, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

श्री समर्थ अवधुत महाराज समाधी मंदिर कलशारोहण वर्धापनदिन २० मे रोजी!

news

शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे विद्यार्थ्यांना यशस्वी औधोगिक धेय्यप्राती मार्गदर्शन शिबीर! 

news

आडाळी एम‌.आय.डी.सी प्रकल्प सुरू करा! ग्रामस्थांची मागणी.

news

Leave a Comment