स्टोरी

खरंतर वकील हा उत्तम नट आहे..! ॲड. राजेंद्र रावराणे

Spread the love

सावंतवाडी (ॲड. संतोष सावंत): वकिलाला कायद्यानेच नट बनवले, वकिलाचा युनिफॉर्म हे देखणेपणाचे व्यक्तिमत्त्वाचे त्याच्या विद्वत्तेचा आदर आहे. वकिलाने प्रोफेशनल इथिक पाळायला हवेत. पैसे कमावण्यापेक्षा आपली ही एक प्रकारची सेवा आहे. हा दृष्टिकोन पळून वकिली व्यवसायात उतरावे. वकिलाकडे नम्रता हवी. अभ्यास करण्याची वृत्ती हवी. प्रत्येक गोष्टी शोध घेता यायला हवा. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असे तुमचे वागणे असेल तर तुम्ही निश्चितपणे आदर्श वकील बनू शकता. असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष तथा वक्ते ॲड राजेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील न्यायालयात सावंतवाडी तालुका वकील संघटना यांच्यावतीने लेक्स डिस्कशन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे दुसरे पर्व मध्ये वकिलांची जबाबदारी आणि कायदे नियम याविषयी वक्ते ॲड. रावराणे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बी. बी. रणशूर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बार असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ वकील ॲड दिलीप नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी ॲड रावराणे पुढे म्हणाले,  खरंतर वकील हा उत्तम नट आहे. त्याला कायद्यानेच नट बनवले आहे. त्याचा युनिफॉर्म हीच त्याची वेगळी ओळख आहे. समाजापरी. जबाबदारी आणि त्याचे पालन करणे हे वकिलाचे कर्तव्य आहे. वकिलाच्या विद्वत्तेचा आदर हे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे.. 1961 वकिलांसंदर्भात आहे त्याचे वाचन प्रत्येक वकिलाने करायला हवे.. जबाबदारीने वागायला हवेच. ज्येष्ठांचा आदर राखणे हे आपले कर्तव्य आहे. बार कौन्सिल चे नियम आहेत त्याचेही तंतोतंतपालन करणे ही आवश्यक आहे. बार कौन्सिल ही जबाबदार संस्था आहे.  वकील हा नेहमीच विद्यार्थी असतो. वकिलाकडे व्यासंगी गुण असायला हवेत.. उत्तम अभ्यासू वकील हे नाव तुम्हाला मिळवायचे असेल तुम्ही ब्रीफ वाचणे गरजेचे आहे. संपूर्ण चार सीट तुम्ही उत्तम प्रकारे वाचून काढायलाच हवी. पक्षकार हा वकिलाचा आरसा आहे. पक्षकार जे तुम्हाला सांगेल त्याची गोपनीयता तुम्ही ठेवायला हवी. नैतिक मूल्य जपणे, ती पाळणे हे कर्तव्य वकिलाचे आहे. कोर्टात तुमचा शब्द फायनल असतो. वकिलाबाबत त्याचा विश्वास हीच त्याची खरी ओळख असते. जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास संपादन कराल आणि विश्वासाला पात्र होऊन तुम्ही काम कराल तेव्हा निश्चितपणे तुम्ही एक आदर्श वकील म्हणून तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. असे त्यांनी स्पष्ट केले

नांदोस हत्याकांड, श्रीधर नाईक खून प्रकरण, कोल्हापूर येथील खून प्रकरणचा अभ्यास अन या प्रकरणांचा छडा ॲड रावराणे  यांनी लावला होता. ॲड रावराणे  म्हणाले मी माझ्या वकिली व्यवसायात अनेक दिग्गज वकिलांसोबत काम केले आहे. प्रसिद्ध वकील बापूसाहेब परुळेकर, ॲड. केतन घाग आधी वकिलांचा आदर्श आहे. मी त्यांच्यासोबत वकिली व्यवसायात काम केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाजलेले श्रीधर नाईक खून प्रकरण तसेच नांदोस येथील हत्याकांड या केस मध्ये मला खूप काही शिकता आले. तसेच कोल्हापूर येथील एका खून प्रकरणात मला प्रसिद्ध वकिलांसोबत काम करण्याची एक वेगळीच संधी मिळाली. या अशा नावाजलेल्या प्रकरणांच्या केस बाबत आलेला अनुभव त्यांनी कथन केला. वकिलाने आपल्या जबाबदारीतच वागायला हवे . बेजबाबदार पणे वागता कमानये आपण समाजाच्या हितासाठी काम करत आहोत त्या दृष्टीनेच एक सेवा वृत्तीने काम केलं तर तुम्ही वकिली व्यवसायात दहा वर्षानंतर तुम्हाला पैशाच्या मागे धावण्याची गरज नाही. असेही त्यांनी स्पष्ट करत वकिली व्यवसाय कसा करायला हवा?  याच्या काही टिप्स दिल्या.

यावेळी सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे तालुकाध्यक्ष. ॲड बीबी रणशूर यांनी नवोदित वकिलानी अभ्यासपूर्ण या व्यवसायात यायला हवे . एक चांगला वकील होण्यासाठी आपली तबीयत चांगली ठेवली पाहिजे. व्यासंग मग तो वाचनाचा असो किंवा समाजसेवेचा जपला पाहिजे, आपल्या व्यवसायाशी समोरच्या वकिलाशी आपल्या पक्षकराशी आणि मुख्य म्हणजे कोर्टाशी प्रामाणिक राहील पाहिजे आणि हे सगळ कळण्यासाठी त्यांना वकिली व्यवसायातील बारकावे काय आहेत? याची जाण व्हावी. यासाठी अशी व्याख्याने आम्ही आयोजित केली आहेत.. असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी प्रास्ताविक. ॲड स्वप्निल कोलगावकर तर सूत्रसंचालन ॲड रत्नकर गवस तर उपस्थितांचे आभार ॲड रणशूर यांनी मानले.


Spread the love

Related posts

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरी.

news

उमेद च्या महिला शक्तीचा विजय!

news

विधवा महिलांच्या नावापूर्वी ‘गं.भा.’ लिहिण्याच्या प्रस्तावावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांकडून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न !

news

Leave a Comment