स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा पंधरावडा निमित्त विविध स्पर्धा संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा पंधरावडा निमित्ताने प्रत्येक विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. सावंतवाडी तालुक्यात भाजपच्या वतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेला जवळपास ६०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला लहान गटापासून ते खुल्या गटापर्यंत ही स्पर्धा झाली. आत्मनिर्भर भारत विकसित भारत आणि डिजिटल भारत या तिन्ही विषयामध्ये स्पर्धकांनी आपल्या कुंचल्यातून आत्मनिर्भर भारत विकसित भारत साकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्रही रेखाटण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी खऱ्या अर्थाने शालेय विद्यार्थी व खुल्या गटात विविध स्पर्धकांनी भाग घेतला. हीच खरी विकसित भारताची नांदी आहे अशा शब्दात स्पर्धकांचे कौतुक केले. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  प्रथम गट इयत्ता पहिली ते पाचवी रंगभरण स्पर्धा, द्वितीय गट सहावी ते दहावी तृतीय गट अकरावी व खुला गट अशा चार विभागात स्पर्धा झाली. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर,  जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम सावंत भोसले, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, जिल्हा सहकार समन्वयक रवींद्र मडगावकर, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, स्वागत नाटेकर, आनंद नेवगी, संजू शिरोडकर,  दिलीप भालेकर, राजू बेग, सौ. मिसबा शेख, दादा मडईकर,  कलाशिक्षक श्री मालवणकर, श्री राठोड,  श्री गाभित, शिक्षिका अर्चना सावंत, सौ साळगावकर, सौ रेवती टोपले, बी. एस. बांदेकर फाईन आर्ट चे प्राध्यापक आधी उपस्थित होते.

यावेळी श्री काळसेकर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी मालवणी कवी दादा मडकईकर व भाजपच्या सावंतवाडी महिला मंडळ पदाधिकारी मिसबा शेख यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मडगावकर यांनी केले.


Spread the love

Related posts

वायंगणी येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा २० मार्च रोजी!

मालवणमध्ये जलरंग मत्सालयाचा शुभारंभ!

news

माड्याचीवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव!

news

Leave a Comment