स्टोरी

मळगाव ब्रिजवर म्हैस आडवी आल्याने अपघात पती-पत्नी जखमी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान धावली मदतीला.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: निळेली येथील महेश नामक युवक वय वर्ष ३२ व त्याची पत्नी मोटर सायकलने घरी जात असताना मळगाव ब्रिजवर म्हैस आडवी आल्याने अपघात घडला.

हा अपघात आज रात्री आठ वाजता घडला त्या अपघातामध्ये महेश यांच्या तोंडाला जब्बर मार बसला आहे तर महेशच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली. महेश ने दहा मिनिटे अगोदर आपल्या पत्नीला स्वतःचे हेल्मेट दिलं होतं त्यानंतर काही मिनिटात हा अपघात घडला. हेल्मेट मुळे आपला जीव वाचला असं त्याच्या पत्नीने सांगितलं तर सकाळीच आपल्या मित्राकडून आपल्या पतीने हेल्मेट मागून घेतलं होतं अशी ही ती म्हणाली. सदर रुग्णाला सावंतवाडी रुग्णालयामध्ये राणे यांनी आपल्या ॲम्बुलन्सने आणलं. प्राथमिक उपचारानंतरव पुढील अधिक उपचारासाठी त्यांना ओरस येथे पाठवण्यात आले.

याकरिता सामाजिक बांधिलकीचे सदस्य रवी जाधव व राणे यांनी त्यांना मदत कार्य केले त्यांचे आभार त्यांच्या कुटुंबीयांनी मानले.


Spread the love

Related posts

ग्राहकांनी सजग राहणे आवश्यक..! – अॅड नकुल पार्सेकर

news

वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध..! उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ १६ ते २२ जून २०२३ रोजी होणार!

news

Leave a Comment