स्टोरी

सह्याद्री फाउंडेशन तर्फे यंदा भरगच्च असा मान्सून महोत्सवाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन तर्फे यंदा भरगच्च असा मान्सून महोत्सव तब्बल एक महिना कालावधीत विविध कार्यक्रम द्वारे आयोजित करण्यात येणार आहे . जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत हा तब्बल एक महिना हा महोत्सव चालणार आहे. यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात येणार आहे. असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. सह्याद्री फाउंडेशन ची बैठक प्रमोद सावंत फार्म हाऊस मध्ये घेण्यात आली. यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ,माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, अध्यक्ष रवींद्र मडगावकर, सचिव प्रताप परब, ॲड संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, अशोक सांगेलकर, प्रमोद सावंत, सुनील खानोलकर, समीर पालव आधी उपस्थित होते.

यावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी हंगामात मानसून महोत्सव घेण्याबाबत निश्चित करण्यात आले. हा महोत्सव तब्बल महिनाभर १८ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत हा महोत्सव घेण्याबाबतचे ठरवण्यात आले.  महिन्याभर कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. कार्यक्रमाचे रूपरेषा पुढील आठ दहा दिवसात निश्चित केली जाणार आहे. सांस्कृतिक सामाजिक उपक्रम या महोत्सवात घेतल्या जाणार आहेत असे निश्चित करण्यात आले.. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

फोटो: सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशनच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, संजू परब, रवींद्र मडगावकर, ॲड संतोष सावंत, प्रताप परब, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, अशोक सांगेलकर, प्रमोद सावंत, सुनील खानोलकर आधी..! छाया: भारत फोटो स्टुडिओ


Spread the love

Related posts

मळगाव कुंभार वाडी जि.प. शाळे मध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने वह्या वाटप

news

आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी…!

news

धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या अल्पंसख्यांकांसाठीच्या सरकारी योजना तात्काळ बंद करा !- अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय.

news

Leave a Comment