स्टोरी

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ५ आणि अर्थ.

Spread the love

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा,

मना सत्यसंकल्प जीवी धरावा,

मना कल्पना ते नको विषयांची,

विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ||५||

अर्थ: पापकर्म करण्याचे मनात आणू नये. नेहमी सदाचाराचाच संकल्प मनात धरावा. विषयवासना मनात असू नये. कारण त्यामुळे लोकांमध्ये छी थूच होते.मनात पापी विचार येऊ देऊ नये. आलेच तर ते लगोलग सोडून द्यावेत. केवळ सत्याचा ध्यास धरावा आणि सद्विचारानाच मनात थारा द्यावा. संकल्प म्हणजे पुढे काय करायचे आहे त्याचा विचार करावा. अर्थातच,रामदास समर्थ सांगताहेत की, हे मानवा, तू तुझ्या पुढील क्रियांबद्दल जे ठरवशील ते केवळ शुद्ध, सत्याला अनुसरून आणि चांगलेच असावे, दुष्टबुद्धीने पापाचाराकडे नेणारे असे असू नये याची जाण ठेव. विषयवासना आणि त्यातून उपजणारे पापकर्म यांची समाजात, जनमानसात केव्हाही छी थूच होते. म्हणून तू अशा विषयवासनांची कल्पनाही मनात येऊ देऊ नकोस.


Spread the love

Related posts

ठाकरे गटाची संपत्ती शिवसेनेला देण्याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली

news

कु. सिद्धेश घाडी यांचा प्रामाणिकपणा..! माजगावचा सिद्धेश आरपीडी कॉलेजचा विद्यार्थी.

news

जागतिक महिला दिनानिमित्त देऊळवाडा येथे विविध कार्यक्रमांचेआयोजन

news

Leave a Comment