स्टोरी

कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबीराचे उदघाटन .

Spread the love

कुडाळ प्रतिनिधी: पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कुडाळ येथे आज गुरुवार दि २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६:०० वाजता संयुक्त योगोपचार शिबिराचे उदघाटन करण्यात आले.या शिबिराला उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री काका कुडाळकर आणि अध्यक्ष म्हणून पतंजलि योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री. शेखर बांदेकर हे लाभले.

यावेळी सोशल मीडिया सावंतवाडी तहसिल प्रभारी श्री लक्ष्मण पावसकर, पत्रकार श्री. अजय सावंत, पत्रकार श्री निलेश जोशी, श्री. रामनाथ सावंत आणि श्री. अनिल मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. दिप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाप्रभारी श्री शेखरजी बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. सूर्यनमस्कार, योगासने, सुक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला शिबिराच्या पहिल्याच दिवशी ८० योगसाधकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल लातये , प्रास्ताविक सौ ऐश्वर्या सावंत यांनी केले. सदर शिबिरास कुडाळ मधील योगाभ्यास प्रेमींनी, तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला.

वासुदेवानंद हॉल, कुडाळ चे मालक श्री प्रसाद नाईक यांनी सदर शिबिरासाठी लागणारे सभागृह, स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. नियमितपणे योगाभ्यास केल्याने आपण रोगमुक्त होतो त्यामुळे प्रत्येकाने योगाभ्यास करणे आवश्यक आहे तसेच शिबिर चालू असे पर्यंत संपूर्ण कुडाळ मधील जनतेने या योगशिबिराचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष श्री शेखर बांदेकर यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

उमदी गावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्‍यांना विषबाधा !

news

शहीद सुभेदार सुनिल सावंत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

news

मंत्रालयातील ३८ विभागांच्या फेर्‍या वाचणार, टपाल एकाच ठिकाणी देता येणार !

news

Leave a Comment