स्टोरी

सार्वजनिक ग्रंथालय अधिवेशनात विविध ठराव मंजूर.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात तिपटीने वाढ करावी, शासनाने नवीन ग्रंथालयांना मान्यता द्यावी व वर्ग बदल करण्यात यावेत असा एकमुखी ठराव सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक ग्रंथालय अधिवेशन मध्ये करण्यात आला. शासनाने जाहीर केलेले ४०% ग्रंथालयांना अनुदान ३१ मार्च २०२५ पूर्वी मिळावे. अशी अपेक्षाही या अधिवेशनामध्ये करण्यात आली. ग्रंथालयांना शासनाच्या माध्यमातून कोणत्या सोयी सुविधा आहे. याबद्दलचा लेखाजोगा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी मांडला. सिंधुदुर्ग जिल्हा हा दुर्गम डोंगराळ आहे त्या भागात नेटवर्क नाही. अशामुळे अनेक ग्रंथालयांना ऑनलाईन काम करताना अडचणी येतात. अशावेळी ग्रंथालयाने आपले भरलेले प्रस्ताव ऑफलाइन ऑफिस कडे ही सादर करावेत. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री हजारे यांनी स्पष्ट केले.

माणगाव येथे जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन वासुदेवानंद सरस्वती वाचनालय येथे झाले यावेळी दुसऱ्या सत्रामध्ये घेतलेल्या खुल्या अधिवेशन मध्ये ग्रंथालयांच्या समस्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात काही महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडाबाबत काढलेल्या परिपत्रकात दुरुस्त करणे, शासनाने जाहीर केलेली ४०% अनुदान वाढ ही ३१ मार्च २०२५ पूर्वीच मिळावी. सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात तिपटीने वाढ करावी, अनुदानाचा शासनाचा निकष ९०% शासन व दहा टक्के संस्था हा निकष आहे. तो सेवक वेतन अनुदानाला लागू न करता वेतन अनुदान शंभर टक्के शासनाने द्यावे. संस्थेवरील दहा टक्के चा बोजा कमी करावा. कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे. ग्रंथालय कायद्याने मान्यता असलेली ग्रंथालयांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी ग्रंथालय नवीन मान्यता वर्ग बदल आणि साधनसामग्री अनुदान पूर्वक सुरू करण्यात यावे. असे पाच ठराव मांडण्यात आले. हे पाचही ठराव जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने शासनाकडे पोहोचवण्यात येणार आहेत असे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या सत्रात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी ग्रंथालय कर्मचारी व संचालक आदींच्या समस्या अडचणी जाणून घेत काही मुद्दे स्पष्ट केले. ते म्हणाले ग्रामीण भागात नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लेखापरीक्षण अहवाल पाठवताना अनेक अडचणी येतात अशावेळी लेखापरीक्षण अहवाल हा मुदतीत पाठवावा लागतो त्यामुळे लेखापरीक्षण अहवाल हा जर नेटवर्क चा प्रॉब्लेम असेल तर काही दिवस अगोदर ऑफलाइन ऑफिस कडे जमाही करण्यास हरकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रंथालय इमारत उभारणी संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात यावेत शासनाच्या माध्यमातून इमारत विस्तारीकरणासाठी दहा ते पंधरा लाख रुपये अनुदान दिले जाते त्यामुळे या अनुदानाचा लाभ अधिकाधिक ग्रंथालयाने घ्यावा व जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवण्यात यावेत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी या जिल्हा ग्रंथालय अधिवेशनामध्ये सचिव राजन पांचाळ यांनी ठराव मांडले त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के. सचिव राजन पांचाळ संचालक संजय शिंदे, एडवोकेट संतोष सावंत. भरत गावडे विठ्ठल कदम सतीश गावडे प्रवीण भोगटे, नंदन वेंगुर्लेकर, अनंत वैद, प्रसाद दळवी, दीक्षा परब, रुजारियो पिंट, गुरुनाथ मडवळ.ला, जयेंद्र तळेकर, डाकू तानावडे. महेश बोवलेकर. स्नेहा फणसळकर, एकनाथ केसरकर, परशुराम चव्हाण शरद कोरगावकर विजय केसरकर विजय पालकर, महेंद्र पटेल, मोहन सावंत, श्री शिरसाठ, आत्माराम, संजय वेरनोडकर आधी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कलंबिस्त हायस्कूलमध्ये वाचक प्रेरणा दिन साजरा….

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १६-१८ फेब्रुवारी रोजी कोकणपुत्र, श्री. सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…!

news

सिंधुदुर्गनगरी येथे देवघर धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी धरणे आंदोलन चालू

news

Leave a Comment