स्टोरी

कारागृहाचे तटभिंतीचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याबाबत कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांचे आवाहन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कारागृहाचे तटभिंतीचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी केले आहे. तसेच नागरिकांना याबाबत श्री सूचना देण्याबाबतचे निवेदन कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी सावंतवाडी नगरपंचायत अधिकारी यांना ही दिले आहे.

निवेदन

 

निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की, सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या मुख्य तटभिंतीची उंची वाढवण्याचे कामकाज मा. जिल्हा अधिकारी यांच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर झाले असल्याने सदय स्थितीस सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडून तटभिंतीचे उंची वाढविण्याचे कामकाज सुरु आहे. सदर बांधकामाकरिता दगडी चिरासह आरसीसी बांधकाम आहे. बांधकाम करताना कारागृहाच्या पश्चिमेकडील (कारागृहाची मागील बाजू) व दक्षिणेकडील (कारागृहाची उजवी कडील बाजू) दैनंदिन वाहतुकीस असणाऱ्या रसत्यावर दगडी चिरे व रेती, वाळू इ. टाकले जाणार असल्याने नागरीकांना वाहतूक करणे शक्य होणार नाही. तसेच वाहतूक बंद न ठेवल्यास नागरिकांच्या जिवीतास हानी पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता कारागृहाच्या पश्चिमेकडील बाजूचे व दक्षिणेकडील बाजूचे बांधकाम करताना तटभिंतीस लागून असलेले दोन्हीही रस्ते वाहतूकीकरीता दिनांक ३०/१२/२०२४ पासून बंद ठेवणे आवश्यक आहे. तरी आपल्या कार्यालयाकडून सावंतवाडीतील नागरीकांना कारागृहाच्या तटभिंतीचे पश्चिमेकडील बाजूचे व दक्षिणेकडील बाजूचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करणे बाबत आवाहन करण्यात यावे, ही विनंती.


Spread the love

Related posts

मसुरे स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम. 

news

मुसळधार पावसात नारायण ठाकूर यांचे घर जमीनदोस्त..!

news

संयुक्त राष्ट्र अमेरिका येथील टेक्सास गोल्ड फिल्म अँड स्पोर्ट फेस्टिव्हलच्या वतीने भारतीय चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून नियुक्ती.

news

Leave a Comment