स्टोरी

लेखक जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तालुकास्तरीय आयोजित वाचक स्पर्धा संपन्न

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ.. व सावंतवाडी श्री श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वाचक स्पर्धा लेखक जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत प्रथम क्रमांक अंकिता संतोष पाटील. तृतीय तनवी गणेश परब. तृतीय प्रगती सदानंद परांजपे उत्तेजनार्थ सृष्टी प्रशांत पाटील यांनी पटकाविला हे स्पर्धा जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जिल्हा ग्रंथालय संघ कुडाळ जिल्हा ग्रंथालय येथे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ही स्पर्धा घेण्यात आली यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विठ्ठल कदम संचालकभरत गावडे. संचालक एडवोकेट संतोष सावंत. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे. आरती मासिकचे प्रभाकर भागवत. प्रा. जी ए बुवा.. रवींद्र भागवत. वाचन मंदिर चे ग्रंथपाल महेंद्र पटेल. आधी उपस्थित होते. या स्पर्धेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना आरती मासिकचे ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भागवत म्हणाले. आपल्याला संस्कार करणारे साहित्य वाचायला हवे. प्रश्न निर्माण करणारे साहित्य हवे दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी. होता येते असे साहित्य संग्रह वाचायला हवे. खरंतर अनेक लेखकांनी अनेक साहित्यिकांनी लिखाण केले आहे पण श्यामची आई. साने गुरुजी यांनी जीव उभी केली आहे त्यातून हे साहित्य संस्कार करणाऱ्या आहे असे साहित्य लेखन वाचायला हवे प्रश्न निर्माण करणारे साहित्य लेखन साने गुरुजींच्या कथासंग्रहामध्ये आहे. काही साहित्य लेखन हे फसवणारे असे असते पण असेच साहित्य वाचा पण त्यापेक्षाही ज्या साहित्य वाचनातून आपल्याला संस्कार मिळतात असे साहित्य लेखनच वाचायलाच हवे तुम्ही जेव्हा वाचणार तेव्हाच तुम्ही काहीतरी लिहू शकता बोलू शकता म्हणून तुमचे हात लिहिते व्हायला हवे . असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी प्रा. जी ए बुवा यांनी यावाचक स्पर्धेतून तुम्ही जे जयवंत दळवी यांच्यावर भाष्य केला ते भाष्य तुम्ही लिखाणातून सादर करा असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विठ्ठल कदम व संचालक भरत गावडे यांनी साहित्य निर्मितीतून आपण घडत गेल्या पाहिजे आणि जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांनी जी साहित्य निर्मिती केली तरी परवा बाजार भंडाऱ्याचे हॉटेल, स्त्री पर्व महानंदा अशा साहित्य निर्मितीतून आपण वाचक व्हायला हवे. या स्पर्धेत अनेक जणांनी तमसाहित्य वाचन केले असे ते म्हणाले यावेळी जवळपास आज वाचकांनी सहभाग घेतला यावेळी सुप्रिया केसरकर प्रवीण ठाकूर दत्तात्रेय कदम रश्मी सावंत श्रिया भागवत. प्रकाश माणगावकर आदी उपस्थित होते या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीस खूप पारितोषिक देण्यात आले तर भाग घेतलेल्या सर्व स्पर्धा कांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी आजच्या उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मालवण येथे ‘राजकोट’ किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे आज भूमीपूजन

news

विद्युत अपघात टाळण्यासाठी विज महावितरणच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने एक दिवशीय तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन….!

news

शेती बागायती हे शाश्वत रोजगाराचे एकमेव साधन..! व्ही. एम. नाईक

news

Leave a Comment