स्टोरी

खोटले ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर;आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला

Spread the love

खोटले सरपंच सुशील परब यांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे आभार

 

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक जो शब्द देतात तो पाळतातच’ याचा प्रत्यय खोटले वासियांना आला आहे. मालवण तालुक्यातील खोटले येथील ग्रामपंचायत कार्यालय अतिशय जीर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायत इमारत केंद्र शाळा खोटले येथे तात्पुरत्या स्वरुपात हलवण्यात आली आहे.मात्र कायमस्वरूपी सुसज्ज ग्रामपंचायत इमारत मिळावी अशी मागणी खोटले ग्रामस्थांची होती. याबाबत खोटले सरपंच सुशिल परब, उद्योजक आशिष परब आणि ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी खोटले ग्रामपंचायत साठी आवश्यक निधी मंजूर करण्याचा शब्द दिला होता.आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून जनसुविधा जिल्हावार्षिक योजनेतून तब्बल २० लाख रु. निधी खोटले ग्रामपंचायत साठी मंजूर करून दिला आहे. लवकर प्रशस्त अशी इमारत याठिकाणी उभी राहणार आहे.त्याबद्दल सरपंच सुशिल परब, ग्रा.प. सदस्य, शिवसेना शाखाप्रमुख, शिवसैनिक व ग्रामस्थांनी आभार मानत आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार केला आहे.


Spread the love

Related posts

श्री जरी मरी आईआई नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ तर्फे श्री गणेशोत्सव २०२३ आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.

news

किनारपट्टीच्या भागात लवकरच नौदलाचे ‘युनिट’ स्थापन होणार…! हरिकुमार, नौदलप्रमुख

news

बिळवस गावच्या कृतिका (श्वेता) पालव याना राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार’ तर ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

news

Leave a Comment