स्टोरी

कोमसाप तर्फे शाखेतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सदस्यांचा सत्कार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा दोन वर्षात साहित्यिक उपक्रम राबवीत ते स्तुत्य आहेत. साहित्य चळवळीचा हा दिवा चिरंतन तेवत राहो. असे प्रतिपादन सावंतवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ यांनी व्यक्त केले. कोमसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच औचित्य साधून राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सभागृहातआयोजित कार्यक्रमात कोमसाप तर्फे शाखेतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सदस्यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

 

कोकण मराठी साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा राणी पार्वती देवी हायस्कूल येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जिल्हास्तरीय साहित्य संमेलन व युवा साहित्य संमेलनचे आयोजन करण्याबाबत अध्यक्ष सावंत स्पष्ट केली. तसेच या सभेच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व पुरस्कार प्राप्त कोमसाप सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ साहित्यिक उषा परब, प्रा रुपेश पाटील, अँड. नकुल पार्सेकर. यांनी मनोगत व्यक्त केले. . डॉ. नवांगुळ यांनी कोमसापच्या साहित्य क्षेत्रातील उपक्रमांचे कौतुक करताना साहित्य चळवळीचा हा दिवा चिरंतन तेवत ठेवा असे मत व्यक्त केले.

 

दरम्यान, डॉ. राजेश नवांगुळ यांनी त्यांच्या मातोश्री सौ. सुनिला नवांगुळ यांच्या नावे तसेच प्रा. रुपेश पाटील यांनी त्यांच्या आजी कै.अजबबाई यशवंतर पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाच हजारांची देगणी कोमसाप शाखेला जाहीर केली. याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सदस्या सौ. उषा परब, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ, कोमसाप अध्यक्ष अँड. संतोष सावंत, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, आरपीडीचे मुख्याध्यापक प्रा. जगदीश धोंड, माजी अध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर, अँड. अरूण पणदुरकर, डॉ. विनया बाड, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, अँड. नकुल पार्सेकर, विठ्ठल कदम, भरत गावडे, प्रा. रूपेश पाटील, दीपक पटेकर, विनायक गांवस, संजीव मोहिते, किशोर वालावलकर, मेघना राऊळ, अस्मिता सावंत-भोसले, मंगल नाईक-जोशी, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू तावडे, सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी तर आभार अभिमन्यू लोंढे यांनी मानले.


Spread the love

Related posts

पनवेलकर कुटुंबियांची वारकरी दिंडी विविध उपक्रमांनी संपन्न…!

news

मसुरे केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा प्रथम!

news

समीर वानखेडे प्रकरणी लपवाछपवीचा खेळ थांबवा,मुंबई हायकोर्टाचे सीबीआयला खडे बोल!

news

Leave a Comment