राजकारण

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरामुळे आज शहर बंद आणि आणि मोर्चाचे आयोजन!

Spread the love

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची नावं बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी नावं देण्यात आली आहेत. याच नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर शहरात नागरिकांकडून मोठा विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. दरम्यान आज शुक्रवार दि. १० मार्च रोजी शहर बंद ठेवाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळी आंदोलने शहरात होत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज औरंगाबाद शहर बंदची ठेवण्यात आलं आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलल्याच्या निषेधार्थ लोकविकास परिषदेतर्फे आज भडकलगेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.


Spread the love

Related posts

जामसंडे कट्टा गावातील भाजपाच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वरा करंगुटकर यांचा मनसेत प्रवेश….

news

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा..

news

शरद पवार यांच्या त्यागपत्रावर आता बोलणार नाही! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

news

Leave a Comment