स्टोरी

उद्योजक उमेश सावंत यांना मातृशोक.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: मूळच्या केसरी येथील आणि सध्या कोल्हापूर शहरातील आयटीआय नजीक *नाळे* कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या मालुताई आत्माराम सावंत (८३) यांचे शुक्रवारी २८ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर येथील मंगळवार आणि गुरुवार पेठ येथील ओंकार कम्युनिकेशन या मोबाईल शॉपीचे तथा आय एफ बी कंपनीचे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याचे वितरक ओंकार डिस्ट्रीब्युटरचे मालक उमेश सावंत तसेच एनसीसी विभागातील निवृत्त मुख्य लिपीक सुदेश सावंत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


Spread the love

Related posts

माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील केतनकुमार गावडे यांनी भेट घेतली! गटनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा .

news

आई-बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करा..! – प्रा. रुपेश पाटील.

news

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान हे आयुर्वेदिक क्षेत्रातले चांगले संस्थान आहे! डॉ. प्रशांत ससाणे

news

Leave a Comment