स्टोरी

जलजीवन मिशनच्या कामांमधील त्रुटी आ. वैभव नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आणल्या निदर्शनास.

Spread the love

प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मान्य.

 

सिंधुदुर्ग: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज ओरोस येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेऊन जलजीवन मिशन योज़नेच्या कामांचा आढावा घेतला. जलजीवन मिशन योज़नेतील एकही काम पूर्ण झालेले नसून कामांमध्ये असलेल्या त्रुटी आ. वैभव नाईक यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. लवकरात लवकर ठेकेदारांकडून सर्व कामे पूर्ण करून घेऊन पाणी टंचाईची समस्या सोडविण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी दिल्या. त्याचबरोबर जलजीवन मिशनची कामे करताना रस्त्याची साईडपट्टी खोदण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत.नागरिकांना याचा त्रास होत असून ठेकेदाराकडून ते सर्व रस्ते सुस्थितीत करून घेण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मान्य केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, विभाग प्रमुख शेखर गावडे, गंगाराम सडवेलकर, नागेश ओरोसकर, अणाव सरपंच लीलाधर अणावकर, रुपेश गरुड, वृषाली गरुड, संजय पारकर, सचिन आचरेकर, रुपेश आमडोस्कर,bयोगेश तावडे, भगवान परब, रवी कदम, नितीन राऊळ, अनंत पाटकर आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमयीन पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन .

news

विलवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा सावंत.

news

सकल हिंदू समाज संचालित – कल्याण पूर्वेत निघाली श्रीरामनवमी निमित्त भव्य शोभा यात्रा !

news

Leave a Comment