स्टोरी

शांतीचा मार्ग सर्वांना सुखाकडे नेईल! प्रभाकर हडकर यांचे प्रतिपादन

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे बौद्ध विकास मंडळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रभाकर हडकर यांनी उद्बोधन केले. जगामध्ये हिंसांचे प्रकार वाढत असून याला आळा घालण्यासाठी तथागतांचा धम्मच सावरू शकेल. तथागतांचे सम्यक विचार, सम्यक वाणी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकारवी असे यावेळी प्रभाकर हडकर म्हणाले. यावेळी विचार मंचावर ग्रामीण शाखेचे अध्यक्ष सुगंध तांबे, मुंबई मंडळाचे सचिव संतोष तांबे, अनिल तांबे, बाबुराव तांबे, मिलिंद तांबे, राजेंद्र तांबे, दीपक तांबे, मुरलीधर तांबे,सागर तांबे, गणेश तांबे, प्रमिल तांबे, महिला मंडळाच्या अध्यक्ष वेदिका तांबे, मृणाल तांबे, अवंतिका तांबे, मेनका तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा समतेचा जागर जागृत ठेवण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे, यासाठी धम्माचे आचरण योग्य होणे आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रचार आपल्याकडून होईल असे मान्यवर म्हणाले.

सायंकाळच्या सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये लागणारे साहित्य वितरीत करण्यात आले. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बीएमसी मधून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर तांबे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच वाडीमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात त्यावेळी भोजनाची व्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळणारे सुभाष कासले, बबन तांबे यांचाही शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद तांबे, आभार सागर तांबे यांनी मानले.


Spread the love

Related posts

कणकवली कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव सुरु…!

news

मसुरे पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा माजी सभापती छोटू ठाकूर यांचा इशारा.

news

जेष्ठांचा सन्मान करून त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या! तहसीलदार वर्षा झालटे यांचे विध्यार्थ्यांना आवाहन

news

Leave a Comment