स्टोरी

न्हावेलीतील बीएसएनएल टॉवर रामभरोसे…!

Spread the love

बीएसएनएलचे नेटवर्क बंद पडत असल्याने ग्राहकांना होतोय आर्थिक भुर्दंड..! अक्षय पार्सेकर

 

सावंतवाडी: न्हावेली येथील सध्या कार्यान्वित असलेल्या बीएसएनएल टॉवरचा येथील ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. गेले काही महिने गावातील या टॉवरचे नेटवर्क बंद पडत आहे. लाईट गेली की टॉवर बंद पडत असतो. तसेच नेटवर्क गायब झाल्याने याचा फटका येथील बीएसएनएल ग्राहकांना आर्थिक स्वरूपात बसत आहे. त्यामुळे येथील इन्व्हर्टर बॅटरी बदलून ती सुस्थितीत आणावी. असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना मनसे पदाधिकारी

वारंवार होणाऱ्या या मनस्तापामुळे येथील ग्राहक वैतागला आहे. इर्मजन्सी एखादा कॉल करायचा झाला तर नेटवर्क अभावी कॉल लागत नाही. तसेच केलेले रिचार्ज चे पैसे वाया जातात. याची दखल मनसे पदाधिकारी, विभाग अध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य अक्षय पार्सेकर, न्हावेली ग्रामस्थांच्या वतीने व ग्राहक यांनी बीएसएनएल जिल्हा प्रबंधक भारत संचार निगम, सावंतवाडी येथील कार्यालयात जाऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात बीएसएनएल टॉवर बाबत असणाऱ्या त्रुटी संदर्भात आक्रमक पवित्रा घेत निवेदन दिले आणि लवकरात लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेऊन व पंधरा दिवसात इन्व्हर्टर बॅटरी बसवून देऊ असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला.व सुरळीत करावी. अन्यथा न झाल्यास मनसे व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मनसे संपर्क अध्यक्ष महेश परब, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, विजय बांदेकर, श्रीराम सावंत, राजन परब, नवनाथ पार्सेकर, कमलेश नाईक, तरूण भारत पत्रकार निलेश परब आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मृगाक्षी हिर्लेकरचे सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत यश!

news

महाराष्‍ट्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सवांच्‍या ठिकाणी वस्‍त्रसंहिता असायला हवी ! अभिनेत्री दीपाली सय्‍यद खान

news

भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा मसुरेत भव्य नागरी सत्कार..!

news

Leave a Comment