स्टोरी

कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने निबंध स्पर्धांचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर दोन गटात निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या आई सौ.मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली आहे

यात पहिला गट पाचवी ते सातवी,  निबंध विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी बाणा, शब्द मर्यादा ५०० तर मोठा गट इयत्ता आठवी ते नववी विषय कवी कुसुमाग्रज यांचे साहित्य आणि कविता शब्दमर्यादा १००० अशी ठेवण्यात आली आहे

यात प्रथम क्रमांक ३५०,  द्वितीय २५०,  तृतीय दोनशे रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी आपले निबंध दहा मार्च पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी संपर्क मळगाव हायस्कूल शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर व सावंतवाडीत राजू तावडे यांच्याकडे 9422584407 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष अध्यक्ष संतोष सावंत व सचिव प्रतिभा चव्हाण यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

बिळवस येथे विजेचा शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी..! एक लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान

news

भारतातील पहिली कोविड नोजल व्हॅक्सीन मुंबईत आजपासून उपलब्ध होणार.

news

मसुरे मध्ये १८ एप्रिल रोजी प्रथमच महिला पुरुष यांच्या मध्ये २०-२० भजन डबलबारी

news

Leave a Comment