स्टोरी

कट्टा येथे मराठी राजभाषा दिन संपन्न…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा, बॅ नाथ पै वाचन मंदिर कट्टा व केंद्रशाळा कट्टा नं १ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशाळा कट्टा येथे विविध उपक्रमाद्वारे मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला. मराठी हस्ताक्षर स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ५० विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या वस्तूबनवल्या. विविध पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.कट्टा नंबर १ च्या विद्यार्थिनीनी बोलतो मराठी या गाण्यावर नृत्य सादर केले व छोटी नाटिका सादर केली. विद्यार्थ्यानी छोट्या कथा व कविता सादर केल्या. शाळेच्या सहशिक्षीका संपदा भाट यानी आजच्या दिनाचे महत्व विद्यार्थ्याना समजावून सांगितले.

दीपक भोगटे यांनी आपण मराठी शाळेत शिकत आहात त्याच शाळेत व्यासापिठावरील सर्व मान्य .वर शिकले आहेत व ते कुठेही कमी पडले नाहीत. त्यामुळे आपण मराठी शाळेत शिकत आहात हे निश्चितच अभिमानास्पद आहे. सर्वांनी आपली मराठी भाषा जास्तीत जास्त वाचन करून समृद्ध करूया असे सांगितले.

यावेळी हस्ताक्षर व हस्तकला स्पर्धेतील विद्यार्थ्याना पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचा निकाल

हस्ताक्षर १ली

प्रथम- पूजा रावले,

द्वितीय- पावनी सावंत,

तृतीय आराध्या ढोलम.

हस्ताक्षर दुसरी इयत्ता

प्रथम वेदीका हुले,

द्वितीय मिथील गुराम,

तृतीय साहील रजपूत.

हस्ताक्षर ३री इयत्ता-

प्रथम हर्षिल मालवदे,

द्वितीय रुद्र पोटफोडे,

तृतीय दुर्वा चिरमुले.

हस्ताक्षर ४थी इयत्ता

प्रथम सिध्दी गुराम,

द्वितीय वेदिका भोजणे,

तृतीय कुंजन फाटक.

हस्तकला १ली –

विजेता पावनी सावंत,

उपविजेता जय ढोलम.

हस्तकला २ री-

विजेता रेवा साळोखे,

साहील रजपूत.

हस्तकला ३री-

विजेता मिताली वारंग,

उपविजेता वेदा जाधव.

हस्तकला ४थी-

विजेता श्लोक चांदरकर,

उपविजेता तनुश्री वालावलकर.

मुख्याध्यापक श्री ठाकूर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास बॅ नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, विश्वस्त विकास म्हाडगुत, दीपक भोगटे, कार्यकारिणी सदस्या वीणा म्हाडगुत, कट्टा कार्यकारिणी सदस्य बापू तळावडेकर, समीर चांदरकर, ग्रंथपाल सुजाता पावसकर, श्रीधर गौधळी, संतोष गिरकर, मुख्या ठाकूर, संपदा भाट, शिवण क्लासच्या विद्यार्थिनी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत कीं खाणमालकांचें ? माजी आ. परशुराम उपरकर

news

कारागृहाचे तटभिंतीचे बांधकाम सुरू असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याबाबत कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांचे आवाहन.

news

सोनूर्ली तिठा ते आरोस बाजार रस्त्याचे सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेच्या मागणी नंतर काम सुरू…!

news

Leave a Comment