स्टोरी

वायंगणी बीज येथे दि. २४ ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन…!

Spread the love

वेंगुर्ला: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगुर्ला तालूक्यातील’ कासवांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे वायंगणी बीज येथे दि. २४ ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कासव महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी वनविभाग आणि समस्त ग्रामस्थ वायंगणी यांच्यावतीने करण्यात आले आहे. सदर कासव महोत्सवास प्रमुख अतिथी म्हणून सन्मानिय मा. ना. नारायण राणे मंत्री सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग, भारत सरकार, मा. ना श्री रविंद्र चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग, मा. ना श्री दिपकभाई केसरकर मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा महाराष्ट्र राज्य, मा. श्री वियनायकजी राऊत, खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

वायंगणी समुद्रकिनारा येथे कासवांच्या प्रजननसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे वातावरण तसेच कासवांचे अंडी घालणेसाठी अनूकूल अशी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे दरवर्षी ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे या वायंगणी समुद्र किनारी वाळूमध्ये नैसर्गिक पदध्तीने अंडी घालण्यासाठी येतात. निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी ऑलिव्ह रिडले कासवांच्या नवजात पिल्लांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करताना पाहण्याची व त्याच्या विषयी अभ्यास करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

या महोत्सवात तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली कासवाबंददल माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. तसेच विविध दुर्मिळ समुद्र वन्यजीवांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. कासवांचा जीवनक्रम व त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे. तसेच निसर्गप्रेमींना ‘कोकणी रानमाणूस’ यांच्या सह कोकणातील स्थानिक लोकांच्या पर्यावरण पूरक जीवनशैली ची अनुभूती घेता येणार आहे. तसेच वायंगणी परिसरातील पारंपारिक घरात राहण्यासह पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपारिक कला याचा आस्वाद घेण्याची संधी देखील पर्यटकांना मिळेल. निसर्गप्रेमींसह पर्यटकांनी या कासव महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी वनविभाग, व ग्रामपंचायत वायंगणी यांनी केले आहे. तसेच या महोत्सवा नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या हॅचरी मधून जसे की फळीयेफोंडा, सागरतीर्थ, उभादांडा, तोंडवली, तळाशील, आचरा, मोचेमाड, इत्यादी ठिकाणाहून पिल्लांना निसर्गात अधिवासात मुक्त करताना स्थानिक कासवमित्रांच्या मदतीने पाहण्याची संधी निसर्गप्रेमींना माहे मे २०२४ पर्यंत मिळणार आहे. त्या करिता संबधित ठिकाणच्या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची परवानगी आवश्यक राहणार आहे.


Spread the love

Related posts

३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्या ; सरन्यायाधीशांचा विधानसभाध्यक्षांना आदेश…..

news

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रमेश यादव याच्या विरोधात भुमाफिया रमेश रामदुलार यादव विरोधी शेतकरी मंच आक्रमक.

news

अंनिसच्या कार्यक्रमांना शाळांमधून कार्यक्रम घेण्यास अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करा ! सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे मागणी

news

Leave a Comment