स्टोरी

बांदा येथे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचे सरपंच मा. श्रीमती प्रियांका नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आज बांदा येथे पंतप्रधान ग्रामीण सडक  (PMGSY) योजनेचे बांदा सरपंच मा. श्रीमती प्रियांका नाईक यांच्या हस्ते व नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम साकारण्यात आला. यावेळी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे सर्वांतर्फे आभार मानण्यात आले. तसेच सदर रस्त्याची गेली अनेक वर्ष बांदा ग्रामपंचायत सातत्याने मागणी करत होती. याचा विचार करून माननीय केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रयत्नातून सदर रस्ता मंजूर झाल्याने उपस्थित ग्रामस्थांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

पंतप्रधान ग्रामसडक योजना (PMGSY) योजनेखाली व माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन गेली १० वर्षे बेपत्ता असलेले खासदार करतात हे हास्यास्पद आहे. शहराचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच या नात्याने बोलावणे शिष्टाचारात असते, तसे न केल्याने हा समस्त बांदा ग्रामस्थांचा अपमान आहे. मागील १० वर्षात बांद्यासाठी किती खासदार निधी दिला हे खासदार यांनी जाहीर करावे व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे फुकट श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. असं बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक म्हणाल्या.


Spread the love

Related posts

देशभरात चित्रपट प्रदर्शित झाला असतांना बंगालमध्ये का नाही? सर्वोच्च न्यायालयाने फटकारले….

news

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतुकीस बंद!

news

कोमसाप चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ वा वाढदिवसा निमित्त ‘पुस्तक तुला’ कार्यक्रमाचे आयोजन.

news

Leave a Comment