राजकारण

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचा माजी खासदार निलेश राणेंवर हल्लाबोल…!

Spread the love

निलेश राणे आमदार होण्यासाठी काहीही बोलत आहेत, नीट अभ्यासपूर्ण बोलावे, आपण खासदार असताना माणगाव खोऱ्यात किती निधी दिला हे जाहिर करावे…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचे आवाहन.

राणेंच्या निवडणुकीत केलेला दहशतवाद, बुथवर मारलेली लाथ माणगाव खोऱ्याच्या भूमीने आणि लोकं विसरले नाहीत…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी.

 

कुडाळ: निलेश राणे आमदार होण्यासाठी अतिउत्साहि कार्यकर्त्यांच्या नादाला लागून काहीही बोलता आहेतदुकानवाड पूलाचा शब्द आमदार वैभवजी नाईक यांनी लोकांना दिला होता. आंबेरी माणगाव पूल, उपवडे पूल खासदार विनायकजी राऊत साहेब आमदार वैभवजी नाईक यांच्या पाठपुराव्या मुळे झालीत दुकांनवाड पूल हे देखील खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्या मुळे झाले. निलेश राणे यांना आम्ही आवाहन करतो कामाची प्रशासकीय मान्यता ही २ फेब्रुवारी २०२२ झाली आणि यावेळी खोके सरकार अस्तिवातच नव्हते. असं युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी म्हटलं आहे. तसेच फक्त टेंडर प्रोसिजर फक्त खोके सरकारच्या काळात झाली म्हणजे ते काम तुम्ही मंजूर केलात अस होत का ? असा प्रश्न ही  युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी उवस्थित केला आहे.

योगेश धुरी पुढे म्हणाले की, तुम्ही माजी खासदार आहात, जबाबदारीने बोला, जरा तुम्ही खासदार आमदार साहेबांचं कौतुक केलं पाहिजे की, मी खासदार होऊन एकदाही इकडे आलो नाही. त्यामानाने तुम्ही चांगल काम केलं. पालकमंत्री यांनी कुडाळ ला २०२३/२४ मध्ये किती कामं दिलीत. हे जाहीर करावे. आयत्या बिळावर नागोबा होऊ नये आणि जनमानसात आपली घालवू नये. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीच वर्क ऑर्डर व्हायच्या अगोदर उद्घाटन करत असतील तर हे कशाचे द्योतक आहे? मतांच्या बेरजेसाठी केलेली ही स्टंट बाजी आहे. त्या भागातील ९ वि १० वि तला पोरगा पण सांगेल की ही काम कोणी केलीत घराघरात आमदार खासदार आमदार पोचलेत आता अस कधी तरी येऊन हे आम्ही केलं ते आम्ही केलं अस सांगू नये. अदानीच्या प्रोजेक्ट बद्दल का उल्लेख केला नाही त्या वनभागात बोअर्स मारता आहेत त्या आमच्या सहकार्याने मारता आहेत हे का जाहीर केले नाही. निलेश राणेंनी कितीही प्रयत्न केले तरी माणगाव खोरे(भूमी,लोक) त्यांना स्वीकारणार नाही. कारण मागच्या निवडणूकित त्यांनी केलेला दहशतवाद अजून लोक विसरले नाहीत त्यांच्या बुथावर मारलेली लाथ लोक विसरले नाहीत आणि त्यांनी ही बुथावर नाही तर माणगाव खोऱ्यावर लाथ मारली होती.


Spread the love

Related posts

मुरादाबादमध्ये भाजपसाठी अत्यंत धक्कादायक वृत्त.

news

सायकल प्रवासातून ‘आरोग्य’ संदेश! मसुरे नं. १ शाळा पदवीधर शिक्षक विनोद सातार्डेकर यांचा आदर्शवत उपक्रम ..

news

दिपक केसरकर यांनी करोडो रुपयांची व्हॅनिटी व्हॅन जमीन विकुन घेतली की खोक्यातून घेतली? हे जाहीर करावे! खा. विनायक राऊत

news

Leave a Comment