स्टोरी

तलाठी भरतीत १४५ जागांपैकी जिल्ह्यातील फक्त ४ जण तलाठी परीक्षेत पात्र:

Spread the love

कुडाळ: जिल्ह्यातील जवळपास हजारो स्थानिक तरुण तरुणींनी तलाठी परीक्षा दिली मात्र हजारो स्थानिक तरुणांपैकी फक्त ४ जण तलाठी परीक्षेत पात्र झाले मात्र बाकी १४१ जागांवर बाहेरच्या जिल्ह्यातील पात्र झालेत. हा येथील पालकमंत्र्यांचा केंद्रीय मंत्र्यांचा करिष्मा आहे, की जास्तीत जास्त पात्र परीक्षार्थी हे परजिल्हातील पात्र झाले. हा करिष्मा करून दाखवल्याबद्दल पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांचे मनापासून अभिनंदन, या त्यांच्या यशाबद्दल युवासेनेचा वतीने पालकमंत्री यांचा सत्कार करायचा आहे. जिल्ह्यातील तरुण फक्त मतांपुरते भाजप ला हवेत. वापरा आणि टाकून द्या, ही भाजप-शिंदे गटाची ची नीती आहे. अशी टीका युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केली आहे.

योगेश धुरी पुढे म्हणाले की, युवा वर्गाने डोळे उघडावेत आणि ह्यांना योग्य ती जागा दाखवावी. सिंधुदुर्ग जिल्हा १०वी, १२ वी च्या परीक्षेत महाराष्ट्रात अव्वल असतो, सिंधुदुर्ग पॅटर्न म्हणून त्याची महाराष्ट्रात वाहवा होते एवढा चांगला बुध्यांक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचा असून ते स्पर्धा परीक्षेत पात्र का होत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे.

केंद्रीय उद्योगमंत्री जिल्ह्यातील असून अजून जिल्हात उद्योग नाहीत महाविकास आघाडीच्या काळात आलेले उद्योग हे गुजरातला चाललेत.अजिंवडे सारखा निसर्गरम्य,औषधी वनस्पतीचा वनभाग अदानीच्या घशात घालण्याचा दलालांचा प्रयत्न आहे. स्थानिक डीएड वाल्यांच्या पोटावर केसरकर लाथच मारणार हे निश्चित आहे केसरकर हे सिंधुदुर्ग ला लागलेल ग्रहण आहे. आम्ही यांना आवाहन करतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण तरुणी इतर जिल्ह्यात किती लागले याची यादी पालकमंत्री,केंद्रीय मंत्री,सत्तेतील आमदार आणि शिंदे-भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जाहीर करावीत.

आमच्या जिल्ह्यातील तरुण तरुणी बाहेर च्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पात्र होत नसतील तर परजिल्हातील लोंढे आम्ही जिल्ह्यात का म्हणून घ्यावेत? तलाठी भरती झाली तशीच शिक्षक भरती होणार. जिल्ह्यातील  ४ ते  ५ जणच पात्र होतील. असं युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी म्हणाले.


Spread the love

Related posts

अनिल मसुरकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष.

news

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ‘आंतरधर्मीय समिती’ची नियुक्ती!

news

कल्याण पूर्वेत पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचा पहाणी दौरा

news

Leave a Comment